Pune : इशरे’च्या ‘ग्रीन कॉन्क्लेव्ह-2024’ मध्ये कार्बनीकरण कमी करण्याची शपथ

एमपीसी न्यूज – निकमार युनिव्हर्सिटी(बालेवाडी) येथे दिवसभर झालेल्या (Pune) परिषदेत ‘एक्सप्लोरिंग द कार्बन वर्ल्ड’ विषयावर विविध मार्गदर्शक सत्रे घेण्यात आली. कार्बन कॅल्क्युलेटरचे प्रशिक्षण देण्यात आले. कार्बन मास्टर पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. यावेळी कार्बनीकरण कमी करण्याची शपथ घेण्यात आली.

दि.3 फेब्रुवारी रोजी ‘सोसायटी ऑफ हिटिंग, रेफ्रिजरेटिंग अँड एयर कंडिशनिंग इंजिनियर्स ‘(इशरे) आणि निकमार युनिव्हर्सिटीच्या वतीने 18 संस्थांच्या सहकार्याने ‘एक्सप्लोरिंग डी-कार्बनायझेशन अँड सस्टेनेबिलिटी’ या विषयावर ‘ग्रीन कॉन्क्लेव्ह -2024’चे आयोजन करण्यात आले होते.

अभिनेते सयाजी शिंदे, डॉ.हरिहरन, डॉ.मिली मजुमदार, स्वप्नील जोशी, डॉ.सुनीता पुरुषोत्तम, टिकेकर वाडीचे सरपंच संतोष टिकेकर यांनी पर्यावरण रक्षणासाठी कार्बन उत्सर्जन कमी करणे (डिकार्बनायझेशन) या विषयावर मार्गदर्शन केले आणि अनुभव (Pune) सांगितले.

योगेश ठक्कर(अध्यक्ष,इशरे सोसायटी),पंकज धारकर(अध्यक्ष,असोचेम),सौरभ दिड्डी (संचालक, बीईई), डॉ.अनिल कश्यप(महासंचालक,निकमार युनिव्हर्सिटी),आशिष रखेजा(उपाध्यक्ष,’अशरे’),दीपक म्हैसेकर(निवृत्त अधिकारी),मेहेर सिधवा,महेश रामानुजन,मुकेश मल्होत्रा(माजी अध्यक्ष,मराठा चेंबर ऑफ कॉमर्स),हबीब खान,ललित गभाने,मनीष गुलालकरी,नंदकिशोर कोतकर(अध्यक्ष,इशरे,पुणे),आर्किटेक्ट डॉ.अंशुल गुजराथी(संयोजक,ग्रीन कॉन्क्लेव्ह 2024) आदी मान्यवर उपस्थित होते .

कार्बन उत्सर्जन रोखण्यात चांगले योगदान देणाऱ्या 10 व्यक्ती,संस्थाना ‘कार्बन मास्टर्स अवॉर्ड्स’ देखील या परिषदेत देण्यात आले. विकसक,बिल्डर,एमइपीएफ कन्सल्टन्ट,पीएमसी, आर्किटेक्ट,सल्लागार,अभियंते ,सर्व्हेयर,ग्रीन बिल्डिंग कन्सल्टन्ट,ऊर्जा व्यवस्थापक,एचव्हीसी अँड आर कन्सल्टन्ट,एसी अँड आर प्रोफशनल्स,नागरिक ,विद्यार्थी असे एकूण 750प्रतिनिधी या परिषदेत सहभागी झाले.

कार्बन प्रदूषण कमी करणे आणि शाश्वत विकास या विषयावर विचारमंथन

‘हवेतील कार्बन प्रदूषण कमी करणे,कार्बन कॅल्क्युलेशन मेथडॉलॉजी,पद्धती,डी- कार्बनायझेशन ,एयर क्वालिटी,हेल्थ,प्रॉडक्टिव्हिटी अँड सस्टेनेबिलिटी’ अशा विषयावर चर्चासत्रे या परिषदेत आयोजित करण्यात आली होती. या एक दिवसीय कॉन्क्लेव्ह मध्ये सौरभ दिड्डी,आशीष रखेजा,अभिनेते सयाजी शिंदे,डॉ.हरिहरन,मिली मुजुमदार,स्वप्नील जोशी,सुनीता पुरुषोत्तम,मेहेर सिधवा,संतोष टिकेकर या मान्यवरानी मार्गदर्शन केले कार्बन उत्सर्जन कसे मोजावे याचे कॅल्क्युलेटर तंत्र शिकवले गेले.उपाययोजनाही सांगितल्या गेल्या. ग्रीन कॉन्क्लेव्हचेही कार्बन उत्सर्जन मोजण्यात आले.

कार्बन न्युट्रालिटी साठी प्रत्येकाने प्रयत्न करावेत: सयाजी शिंदे

या परिषदेत बोलताना अभिनेते सयाजी शिंदे म्हणाले, ‘कार्बन न्युट्रल होण्यासाठी आपण प्रत्यक्ष काम केले पाहिजे. प्रत्येकाने पुढाकार घेतला पाहिजे. केवळ गॅलरीत झाडे लावून चालणार नाही. देशी झाडे सर्वत्र लावली पाहिजेत.इव्हेंट करून सर्व साध्य होणार नाही. व्यावसायिक आणि सामाजिक संस्थांनी, कंपन्यांनी वृक्ष लागवडीत योगदान दिले पाहिजे. झाडांबरोबर वेल, गवत सगळे जपले पाहिजे. मंदिरांमध्ये वृक्ष रोपे प्रसाद म्हणून दिले पाहिजे. देवस्थानाच्या जागेत वृक्ष लागले पाहिजेत,यासाठी ‘सह्याद्री देवराई’ प्रयत्न करीत आहे,असेही त्यांनी सांगितले.

Pune : सी एल पुलकुंडवार पुण्याचे नवे विभागीय आयुक्त;राज्यातील सात आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या

आचरणातून दिला कार्बन उत्सर्जन कमी करण्याचा संदेश

‘ग्रीन कॉन्क्लेव्ह-2024’ या राष्ट्रीय परिषदेच्या आयोजनातून कार्बन उत्सर्जन कमी करण्याचा संदेश कृतीतून आणि आचरणातून देण्यात आला. पाण्याच्या प्लास्टिक च्या बाटल्या परिषदेत ठेवण्यात आल्या नाहीत तर साध्या पाण्याची सोय करण्यात आली.स्वतंत्र वाहनातून प्रतिनिधी परिषदेला न येता ठिकठिकाणाहून ‘कार पुलिंग’ तसेच सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा पर्याय देण्यात आला.परिषदेत कागदाचा कमीत कमी वापर करण्यात आला. कार्यक्रमाच्या ठिकाणी फ्लेक्स हे पुनर्वापर करता येतील असेच लावण्यात आले तसेच भोजन व्यवस्थेत देखील निसर्गाची जपणूक करण्याचा विचार (कार्बन फूट प्रिंट)करण्यात आला.

परिषदेत सहभागी होणाऱ्या 750 प्रतिनिधीनी पुढील काळात कार्बन उत्सर्जन रोखण्याची शपथ घेतली. आगामी काळात पुण्यातील सर्व मोठ्या संस्थांमध्ये जाऊन प्रबोधन करण्यात येणार आहे. कार्बन उत्सर्जन रोखण्यासाठी स्कोप-1,स्कोप-2,स्कोप-3 या पायऱ्या असून त्याकडे लक्ष दिले जात आहे.ही राष्ट्रीय परिषद अशा स्वरूपाच्या कार्यक्रम व्यवस्थापनाचे आदर्श ‘मॉडेल’ ठरेल,असे अंशुल गुजराथी यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.