Chinchwad : पिंपरी-चिंचवडच्या वैष्णवी भोंडवे हिला ‘युएन’ची फेलोशिप

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवडची रहिवासी असलेल्या वैष्णवी अभिजित भोंडवे हिला युनायटेड नेशन्स मिलेनियम कॅम्पस नेटवर्क (युएन-एमसी एन) ची फेलोशिप मिळाली आहे. वैष्णवी सध्या नागपूर येथील विश्वेश्वरैया अभियांत्रिकी संस्थेत (व्हीएनआयटी) शिक्षण घेत आहे. तिच्यासह संस्थेच्या आठ विद्यार्थ्यांना ही फेलोशिप मिळाली आहे. केंद्रातील माहिती आणि तंत्रज्ञान विभागाचे संयुक्त सचिव संकेत भोंडवे यांची ती पुतणी आहे.

Talegaon Dabhade : तळेगाव दाभाडे मध्ये एकाच वेळी दोन सोसायटीमध्ये घरफोडी

शाश्वत विकास या संकल्पनेअंतर्गत सदर केलेल्या प्रकल्पाला युनायटेड नेशन्स मिलेनियम कॅम्पस नेटवर्क (युएन-एमसी एन) ची फेलोशिप मिळाली असून त्या अंतर्गत संस्थेचा संपूर्ण परिसर कचरामुक्त करण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.

नागपूर शहरात विस्तीर्ण परिसरात व्हीएनआयटीचे कॅम्पस विखुरलेले आहे. विविध वृक्ष आणि आता सातत्याने निर्माण होत असलेल्या इमारतीमुळे या परिसराला स्वच्छ ठेवणे ही तारेवरची कसरत आहे. त्यामुळे या विषयावर अंतिम वर्षातील विविध शाखांच्या आठ विद्यार्थ्यांनी मिलेनियम फेलोशिप प्रोग्राम हा युनायटेड नेशन्स अॅकॅडमिक इम्पॅक्ट आणि मिलेनियम कॅम्पस नेटवर्कचा उपक्रमात सहभागी होण्यासाठी अर्ज केला.

वैष्णवी भोंडवे, समर्थ दीक्षित, श्रद्धा तळे, अनुष्का दशपुत्र, तमघ्न चौधरी, जान्हवी म्हेत्रे, ओम भिसे, यशस्वी ठेरकर या विद्यार्थ्यांचा यामध्ये समावेश आहे. यासाठी झालेल्या स्पर्धेत 119 देशांतील 44 हजार पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी चार हजार मिलेनियम स्कॉलर्सची 260 कॅम्पसमध्ये होस्ट करण्यासाठी निवड करण्यात आली आहे.

त्यामध्ये व्हीएनआयटीचाही समावेश आहे. विशेष म्हणजे व्हीएनआयटी च्या विद्यार्थ्यांनी ‘झिरो वेस्ट कॅम्पस’ या प्रकल्पाचे सादरीकरण केले होते. या प्रकल्पाची निवड फेलोशिपसाठी करण्यात आली. त्यानुसार आता व्हीएनआयटी परिसरात असलेला प्लास्टिक, ई-कचरा व इतर कुठलाही घनकचरा याचे व्यवस्थापन करण्यात येणार आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.