Chinchwad : प्रतिभा इंटरनॅशनल स्कूलच्या पल्लव तोडके स्केटिंग स्पर्धेत प्रथम

एमपीसी न्यूज : प्रतिभा इंटरनॅशनल स्कूल अ‍ॅड ज्यूनियर कॉलेजचा (सी.बी.एस.ई बोर्ड) विद्यार्थी पल्लव तोडके (Chinchwad) स्केटिंग स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकाविला आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेअंतर्गत आयोजित क्रीडा स्पर्धेत प्रतिभा इंटरनॅशनल स्कूल अ‍ॅण्ड ज्यूनियर कॉलेज विद्यालयाने यात सहभाग नोंदवला होता.

अजमेरा स्केटिंग ग्राउंड पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने स्केटिंग चॅम्पियनशीप 2023 या स्पर्धेचे आयोजन केले होते. 8 वर्षाखालील वयोगटात प्रतिभा इंटरनॅशनल स्कूल अ‍ॅण्ड ज्यूनियर कॉलेज दुसरीचा विद्यार्थी पल्लव तोडके या विद्यार्थ्यांने स्केटिंग स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकाविला आहे.

RSS : आजपासून 16 सप्टेंबरपर्यंत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची समन्वय समितीची होणार बैठक

प्रथम क्रमांक मिळाल्याबद्दल या विद्यार्थ्यांना पारितोषिक व पदक देऊन गौरविण्यात आले. कॉलेजच्या प्राचार्या सविता ट्रॅव्हीस, उपप्राचार्या लिजा सोजू, कमला शिक्षण संस्थेचे सचिव डॉ. दीपक शहा, खजिनदार डॉ. भूपाली शहा यांनी विद्यार्थ्याने मिळविलेल्या यशाबद्दल अभिनंदन केले व भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.