Chinchwad : अनधिकृत बांधकामावरील कारवाईला वेग, पिंपळेगुरवमधील बांधकाम पाडले

एमपीसी न्यूज – विधानसभा निवडणूक संपताच चिंचवड मतदारसंघात अनधिकृत बांधकामावरील कारवाईला वेग आला आहे. अनधिकृत बांधकामे भुईसपाट केली जात आहेत. पिंपळेगुरव वैदुवस्ती परिसरातील एक अनधिकृत आरसीसी बांधकाम बुधवारी पाडण्यात आले. दरम्यान, राजकीय द्वेषातून आणि सुडभावनेतून सत्ताधारी भाजपच्या सांगण्यावरुन कारवाई केली जात असल्याचा विरोधकांचा आरोप आहे.

महापालिकेच्या अतिक्रमण व अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाने पिंपळेगुरव प्रभाग क्रमांक 29 मधील वैदुवस्ती परिसरातील एक आरसीसी अंदाजे क्षेत्रफळ 5500.00 चौरस फुटाच्या अनधिकृत बांधकाम पाडले. एक पोलकलेन, एक डंपर, मजूर यांच्या सहाय्याने ही कारवाई करण्यात आली. कारवाई दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

दरम्यान, निवडणुकीनंतर सत्ताधारी भाजपकडून राजकीय द्वेषातून आणि सूड भावनेतून कारवाई केली जात आहे. सरसकट अनधिकृत बांधकामांवर कारवाई केली जात नाही. ठरवून कारवाई केली जात असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.