Chinchwad : राष्ट्रीय धनुर्विद्या स्पर्धेत चिंचवडच्या श्री. शिवछत्रपती शिवाजीराजे माध्यमिक विद्यालयातील भार्गवी पवारची निवड

एमपीसी न्यूज : चिंचवड येथे झालेल्या (Chinchwad) मिनी सब-ज्युनिअर आर्चरी सिलेक्शन ट्रायल स्पर्धेत चिंचवडच्या श्री. शिवछत्रपती शिवाजीराजे माध्यमिक विद्यालयातील इयत्ता 3 री ची विद्यार्थिनी भार्गवी रविंद्र पवार हिने कंपाउंड राउंड प्रकारात 360 पैकी 356 गुण प्राप्त करत सुवर्णपदक पटकावले आणि तिची हिंगोली येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेकरिता निवड झाली. त्यानंतर रविवार दिनांक 28 जानेवारी रोजी औंढा नागनाथ जिल्हा-हिंगोली येथे झालेल्या 7 व्या अंडर-नाईन तथा 15 व्या मिनी सब-ज्युनिअर राज्यस्तरीय स्पर्धेत कंपाउंड राउंड प्रकारात भार्गवीने 720 पैकी 706 गुण प्राप्त करत सुवर्ण पदक प्राप्त केले. आंध्रप्रदेशमधील विजयवाडा या ठिकाणी होणाऱ्या राष्ट्रीय धनुर्विद्या स्पर्धेकरिता भार्गवीची निवड झाली आहे.

संस्थेचे अध्यक्ष जगदीश जाधव यांनी भार्गवीच्या या दैदिप्यमान आणि दणदणीत यशाबद्दल तिचे विशेष अभिनंदन केले आणि संस्थेच्या वतीने तिचा यथोचित सत्कार केला. भार्गवीच्या यशाबद्दल बोलताना तिचे हे यश तिच्या क्रीडा क्षेत्रातील कारकीर्दीची खरी सुरुवात असून इतर विद्यार्थ्यांसाठी अत्यंत प्रेरक असे  आदर्श ठरणार असल्याचे ते म्हणाले. तिच्या या यशामध्ये तिच्या पालकांचेही मोलाचे योगदान असल्याचेही ते म्हणाले.

Budget Session 2024 : आजपासून अर्थसंकल्पीय अधिवेशनास होणार प्रारंभ, लोकसभा निवडणुकीपूर्वी संसदेचे शेवटचे अधिवेशन

संस्थेचे सचिव संजय जाधव व संचालक विजय जाधव यांनीही (Chinchwad) भार्गवीचे तिच्या यशाबद्दल मन:पूर्वक कौतुक केले आणि तिला राष्ट्रीय स्पर्धेकरिता शुभेच्छा दिल्या. विद्यालयाचे मुख्याध्यापक बाळाराम पाटील तथा साहेबराव देवरे यांनी भार्गवीने मिळविलेल्या नेत्रदीपक यशाबद्दल आणि विद्यालयाचा नावलौकिक वाढविल्याबद्दल समाधान व्यक्त केले.

सदर प्रसंगी उपस्थित विद्यालयाचे उपमुख्याध्यापक किसन आहिरे, पर्यवेक्षक दत्तात्रय भालेराव, कोअर कमिटी सदस्या सुषमा संधान, मनिषा जाधव, छाया ओव्हाळ तथा क्रीडाशिक्षक शब्बीर मोमीन यांनीही भार्गवीला पुढील कारकीर्दीकरिता शुभेच्छा दिल्या.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.