Chinchwad : सासरच्या त्रासाला कंटाळून विवाहितेचा आत्महत्येचा प्रयत्न

एमपीसी न्यूज – सासरच्या त्रासाला कंटाळून एका विवाहित महिलेने मुंग्या मारण्याचे पावडर खाऊन तसेच स्वतःच्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेत आत्महत्येचा प्रयत्न केला. यामध्ये महिला गंभीर जखमी झाली. ही घटना शुक्रवारी रात्री साडेनऊच्या सुमारास उद्योग नगर चिंचवड येथे घडली.

याप्रकरणी पती चेतन गोविंद चौधरी, सासू रजनी गोविंद चौधरी, सासरे गोविंद चौधरी यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. योगिता चौधरी (वय 34) यांनी याबाबत तक्रार दिली आहे.

  • पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, योगिता आणि चेतन दोघेही डॉक्टर आहेत. योगिता आणि त्यांच्या सासरच्यांशी वारंवार भांडणे होत. त्यामुळे सासरच्यांनी योगिता यांच्याविरोधात पोलिसात तक्रार दिली. पोलिसांनी योगिता यांना समज दिली. त्यानंतर योगिता यांनी शुक्रवारी रात्री नऊच्या सुमारास मुंग्या मारण्याचे औषध घेतले.

पोटात मळमळ होऊ लागल्याने त्यांनी चेतनला बोलावले. चेतनने पुन्हा त्यांना मारहाण केली. यामुळे योगिता यांनी अंगावर रॉकेल ओतून घेतले. चेतन यानेही स्वतःच्या अंगावर रॉकेल ओतून घेतले आणि हातामध्ये काडीपेटी घेतली.

  • यामुळे घाबरलेल्या योगिता यांनी चेतनच्या हातातून काडीपेटी घेत स्वतः पेटवून घेतले. यामध्ये त्या शंभर टक्के भाजल्या असून त्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले आहे यावरून गुन्हा दाखल केला असून चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.