Chinchwad : सर्वोच्च न्यायालयाने अयोध्या प्रकरणासंबंधी दिलेल्या निर्णयाचे पिंपरी-चिंचवडमधील मुस्लिम समाजाकडून स्वागत

एमपीसी न्यूज – अयोध्या येथील विवादित जागेवर केंद्र सरकारने ट्रस्ट स्थापन करून राम मंदिर निर्माण करावे. तसेच मुस्लिम बांधवांसाठी पाच एकर जमीन मोक्याच्या ठिकाणी असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाच्या पाच न्यायाधिकांच्या खंडपीठाने अंतिम निर्णय दिला आहे. या निर्णयाचे स्वागत पिंपरी-चिंचवडमधील मुस्लिम समाजाकडून स्वागत करण्यात आले.

तसेच पिंपरी-चिंचवड जुलूस समितीचे अध्यक्ष याकुब खान, माजी अध्यक्ष हाजीगुलाम सय्यद, हाजी खाजाभाई कुरेशी, उपाध्यक्ष युसूफ कुरेशी यांनी देखील सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय मान्य असून धार्मिक एकोपा आणि सलोखा कायम रहावा, असे आवाहनही त्यांनी केले.

याचे भारतीय भालदार समाजाचे राज्याचे अध्यक्ष गुलामअली भालदार यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे विविधतेने एकतेचे निर्णय आहे. भारताच्यासंविधानाचा उद्देशिकात सार्वभौम समाजवादी व धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य आहे. सर्व जाती, धर्माच्या लोकांना सामाजिक, आर्थिक, राजनैतिक, न्याय, विचार, अभिव्यक्ति, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य दर्जाची व संधीची समानता प्रमाणे हा निर्णय झाला.

भारतरत्न व घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानामुळे देशातील कोणत्याही प्रश्नांची तड ही न्यायानेच करता येते हेच आज सिद्ध झाले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.