Chinchwad News : चिंचवडे नगर येथील रक्तदान शिबिरात 110 युनिट रक्त संकलन

एमपीसी न्यूज – राज्यातील रक्ताचा तुटवडा लक्षात घेता चिंचवडे नगर येथील आयोजित रक्तदान शिबिरात 110 युनिट रक्त संकलित करण्यात आले. माजी उपमहापौर सचिन चिंचवडे युथ फाऊंडेशन, सद्गुरू बाळुमामा बहुद्देशीय संस्था, ऑल इंडिया धनगर समाज महासंघ, जय गुरुदत्त मित्र मंडळ चिंचवडेनगर, क्षत्रिय माळी समाज सुधारक संस्था या संस्थांच्या संयुक्त विद्यमाने चिंचवडेनगर येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

_MPC_DIR_MPU_II

यावेळी माजी उपमहापौर नगरसेवक सचिन चिंचवडे, लिलाधर मगरे, बंडू मारकड पाटील, युवराज वाल्हेकर, व्यंकटेश वाघमोडे, सचिन कोपनर, नागनाथ वायकुळे, संजय कवितके आदी उपस्थित होते.

आचार्य आनंद ऋषीजी ब्लड बँक, पुणे यांनी रक्त संकलित केले. रक्तदात्यांनी दिलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल माजी उपमहापौर व विद्यमान नगरसेवक सचिन चिंचवडे व बंडू मारकड पाटील यांनी समाधान व्यक्त करीत रक्तदात्यांचे आभार मानले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.