Chinchwad news: ऑल इंडिया धनगर महासंघातर्फे वाफ घेण्याच्या 300 मशीनचे वाटप

एमपीसी न्यूज – ऑल इंडिया धनगर महासंघ (दिल्ली) आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर प्रतिष्ठान चिंचवडेनगर यांच्यावतीने तीनशे नागरिकांना वाफ घेण्याच्या मशीनचे वाटप करण्यात आले.

कोविड-19 संकटाच्या काळात अगदी सुरुवातीपासून महासंघ गरजूंच्या मदतीसाठी उभा ठाकला आहे. हे संकट अजूनही संपलेले नाही. यात विविध पातळ्यांवर लढणाऱ्या कोरोना योद्ध्यांसोबत आम्ही कायम ठामपणे उभे आहोत. वाफ घेतल्याने कोरोनापासून काही प्रमाणात दूर राहता येते, हे सिद्ध झाले आहे.

त्यामुळे दसऱ्याचा मुहूर्त साधत जास्तीत जास्त नागरिकांना वाफ देण्याचे मशीन पुरविण्याचा प्रयत्न करण्यात येत असून, सुमारे तीनशे घरी या मशीनचे वाटप करण्यात आले. अधिकाधिक लोकांपर्यंत मदत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहोत, असे महासंघाचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष बंडू गायकवाड यांनी सांगितले.

यावेळी महासंघाचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष बंडू मारकड पाटील, नागनाथ वायकुळे, रावसाहेब कारंडे, काका मारकड, सुरेश मारकड, संपत मारकड, धोंडीराम वायकुळे, तानाजी कोपनर, सचिन कोपनर, नितीन कोपनर, जयसिंग कोपनर, संदीपान कोपनर, बिरमल मारकड, बिभीषण घोडके, संभाजी यमगर, सतीश पाटील, नानासाहेब सोट पाटील, सागर मारकड, अक्षय वायकुळे, प्रभाकर कोळेकर आदी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.