Chinchwad news: ‘शिवछत्रपती शिवाजीराजे’ विद्यालयाचे संस्थापक अण्णासाहेब जाधव यांचे निधन

एमपीसी न्यूज – विकास शिक्षण मंडळ संचालित चिंचवड येथील श्री शिवछत्रपती शिवाजीराजे माध्यमिक विद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष रामचंद्र उर्फ अण्णासाहेब जाधव ( वय 80 ) यांचे आज (मंगळवारी) वृद्धपकाळाने निधन झाले.

त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले, एक मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे.मागील आठ दिवसांपासून त्यांच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते.  अल्पसा आजार आणि वृद्धपकाळाने त्यांचे आज निधन झाले.

अण्णासाहेब जाधव एसआरपीएफमध्ये होते. सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांनी टाटा मोटर्स कंपनीत सुरक्षारक्षक म्हणून नोकरी केली. सामाजिक कार्याची त्यांना आवड होती. त्यातून मोहननगरमध्ये लहान मुलांसाठी व्यायामशाळा सुरू केली. त्यानंतर शाळा सुरू केली.

श्री शिवछत्रपती शिवाजीराजे माध्यमिक विद्यालयाची स्थापना केली. विद्यार्थ्यांना तांत्रिक शिक्षक देणारे उपक्रम राबविले. सायन्स लॅब सुरू केली. एक आदर्श शाळा, महाविद्यालय त्यांनी उभारले. शिक्षणक्षेत्रात त्यांचे मोठे योगदान राहिले. त्यांनी शहरात बॉक्सिंग, जिम्नॅस्टिक, नेमबाजी हे खेळ आणले. त्यासाठी केएसीबी चौकात काही जागा उपलब्ध करून दिली आहे.

अण्णासाहेब जाधव यांनी पिंपरी-चिंचवड महापालिकेची निवडणूकही लढविली. पण, त्यांना त्यात यश आले नाही. निवडणूक लढविली तरी शिक्षणक्षेत्र आणि समाजसेवेपासून बाजूला गेले नाहीत. या क्षेत्रात त्यांनी शेवटपर्यंत काम केले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.