Chinchwad News: आमदार लक्ष्मण जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त रविवारी विद्यानगरमध्ये हाडांची ठिसुळता तपासणी शिबिर

एमपीसी न्यूज – आमदार लक्ष्मण जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपचे प्रदेश सचिव अमित गोरखे, शहर सुधारण समिती सभापती अनुराधा गोरखे यांच्यावतीने उद्या (रविवारी) हाडांची ठीसुळता मोफत तपासणी मोफत शिबिराचे आयोजन केले आहे. या शिबिरात दत्तनगर, विद्यानगर, रामनगर परिसरातील नागरिकांची तपासणी केली जाणार आहे.

अहिल्यादेवी होळकर दवाखाना येथे रविवारी सकाळी साडेनऊ वाजता शिबिर सुरु होईल. डॉ. विष्णू नांदेडकर हे मोफत सल्ला देणार आहेत. दत्तनगर, विद्यानगर, रामनगर परिसरातील जास्तीत-जास्त नागरिकांनी शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन आयोजकांनी केले.

श्री दत्त मित्र मंडळ दत्तनगर, शिव नयन मित्र मंडळ दत्तनगर, सुशील भाऊ गायकवाड युवा मंच दत्त नगर, शिवगर्जना मित्र मंडळ दत्तनगर, ओंकार मित्र मंडळ दत्तनगर ,मोरया मित्र मंडळ दत्तनगर, ओम शिवशक्ती मित्र मंडळ शंकर नगर, श्री दत्त सेवा मंडळ विद्यानगर, गोल्डन मित्र मंडळ विद्यानगर,रमाई प्रतिष्ठान विद्यानगर ,जय महाराष्ट्र मित्र मंडळ विद्यानगर, एकता मित्र मंडळ विद्यानगर, आर्यन बॉईज मित्र मंडळ विद्यानगर, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे मित्र मंडळ दत्तनगर, शिवरत्न मित्र मंडळ दत्तनगर ,श्री गणेश मित्र मंडळ, दत्तनगर, दैवत ग्रुप दत्तनगर,ओम साई मित्र मंडळ दत्तनगर, विद्यानगर फ्रेंड सर्कल विद्यानगर, फुलचंद भाऊ पात्रे मित्र मंडळ विद्यानगर यांनी संयोजनात पुढाकार घेतला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.