Chinchwad News: दुर्गा ब्रिगेड संघटनेतर्फे महिलादिन उत्साहात साजरा

एमपीसी न्यूज –  दुर्गा ब्रिगेड संघटनेच्या वतीने जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
चिंचवड अॅटो क्लस्टर येथे झालेल्या कार्यक्रमाला महापौर उषा  ढोरे, महापालिका आयुक्त राजेश पाटील, पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष अभय भोर. ज्येष्ठ नृत्य कथकार डॉ. नंदकिशोर कपोते, सुप्रसिद्ध अभिनेते विनायक भावे, जिल्हा उद्योग केंद्रच्या शैला वानखेडे,  डॉ. कांचन साठे, वेरोनिका डिमेलो उपस्थित होते.

दुर्गा ब्रिगेड संस्थापक अध्यक्ष दुर्गा भोर यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. या प्रसंगी  दहा दुर्गा शक्ती पुरस्कार प्रदान करण्यात आला.  कचरावेचक महिला शहरातील प्लास्टिक कचरा उचलून एक प्रकारे शहर स्वच्छतेचे काम करत असतात. या महिलांना समाजात एक  प्रतिष्ठा निर्माण करून देण्यासाठी स्वच्छता रक्षक म्हणून पोषाख आयुक्तांच्या हस्ते देण्यात आला. दुर्गा ब्रिगेड तर्फे औद्योगिक परिसरात महिलांना काम देण्यात आले.

भारतातील पहिली रिक्षाचालक शीला डावरे, उद्योजिका मुरूडकर झेंडेवाले,  अभिनेत्री डॉ. शुकलिमा पोटे, नंदकिशोर कल्चरल सोसायटी,  उद्योजिका वर्षा भालेराव, वेरोनिका डिमेलो, उद्योजिका रेश्मा चोरगे, उत्कृष्ट मुख्याध्यापिका उमा माने, उद्योजिका गंधाली चव्हाण, पीएमपीएलच्या महिला मेकॅनिक  पूजा पाटील आणि संगीता मेश्राम आणि महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमास महिलांसाठी  चार्ली चॅप्लिन ही भूमिका एका अभिनेत्याने साकारून महिलांचा विरंगुळा केला.  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.  शुकलिमा पोटे यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.