Chinchwad News :  लक्ष्मण जगताप यांच्या स्मरणार्थ संत तुकाराम महाराज मंदिर उभारणीसाठी 1 कोटी 60 लाखांची मदत

एमपीसी न्यूज – चिंचवडचे आमदार दिवंगत लक्ष्मण जगताप यांच्या स्मरणार्थ संत तुकाराम महाराज मंदिर उभारणीसाठी 1 कोटी 60 लाखांची मदत करण्यात (Chinchwad News) आली आहे.

जगताप यांच्या स्मरणार्थ त्यांचे कुटुंबीय, नातेवाईक आणि मित्र परिवाराच्या वतीने भंडारा डोंगरावर उभारण्यात येणाऱ्या संत तुकाराम महाराज मंदिरासाठी 1 कोटी 60 लाखांची मदत देण्यात आली. अध्यक्ष बाळासाहेब काशीद पाटील यांच्याकडे 1 कोटी 60 लाखांचा धनादेश सुपूर्त केला.

Lonavala News :लोणावळ्यातील वाहतूकीबाबत वाहतूक व्यवस्थापन आराखडा तयार करा- जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख

दरम्यान, दशक्रिया विधीसाठी राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. तानाजीराव सावंत, खासदार श्रीरंग बारणे, आमदार व भाजपचे शहराध्यक्ष महेश लांडगे, आमदार संजय जगताप, सुनील टिंगरे, माजी मंत्री बाळा भेगडे, माजी आमदार विलास लांडे, बाळासाहेब शिवरकर, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विनोद बन्सल, दादा वेदक, आचार्य रामकृष्णदास लहवितकर महाराज, पंकज महाराज गावडे यांच्यासह शहरातील सर्वपक्षीय माजी नगरसेवक व नगरसेविका, सर्वपक्षीय पदाधिकारी व कार्यकर्ते, पिंपरी-चिंचवड (Chinchwad News)महापालिकेचे आजी व माजी अधिकारी-कर्मचारी, नागरिक, महिला मोठ्या  संख्येने उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.