Chinchwad News : लायन्स क्लब भोजापूर गोल्डच्या अध्यक्षपदी ला. सुरेखा साबळे

एमपीसी न्यूज – लायन्स क्लब भोजापूर गोल्डच्या अध्यक्षपदी ला. सुरेखा विलास साबळे यांची निवड करण्यात आली आहे. लायन्स क्लब भोजापूर गोल्डच्या पदग्रहण सोहळा काळेवाडी येथील रागा पॅलेस येथे नुकताच पार पडला.

या पदग्रहण सोहळ्यात लायन्स डिस्ट्रिक्ट 3234D2 उपप्रांतपाल एमजेफ लायन राजेश कोठावदे यांनी 2021-22 या वर्षासाठी पदाधिकाऱ्यांना पद व अधिकार प्रदान करण्याची शपथ देऊन पदग्रहण सोहळा पार पडला.

यावेळी अध्यक्ष ला. सुरेखा साबळे, सेक्रेटरी ला. जयश्री साठे व खजिनदार म्हणून डॉ. दीपाली कुलकर्णी यांची तर उपाध्यक्ष म्हणून डॉ. शंकर गायकवाड यांनी शपथ घेतली. अध्यक्षा ला. सुरेखा साबळे यांनी ऑर्गन डोनेशन साठी भरीव काम करणार असल्याचे सांगितले.

यावेळी व्याख्याते प्रा. दि.बा. बागुल मुख्य अतिथी म्हणून उपस्थित होते. तसेच, रिजन चेअरमन राजश्री शहा व झोन चेअरमन ला. बी. के. शर्मा उपस्थित होते.

अध्यक्षांच्या सेवाकार्याची सुरुवात म्हणून बीड मधील शेतमजुराचा मुलगा सतिश पाटोळे या विद्यार्थ्याचा तीन वर्षाच्या शिक्षणाचा पूर्ण खर्च व त्याच्या UPSC /MPSC च्या शिक्षणाची फी म्हणून दीड लाख रुपयाची मदत क्लबचे जेष्ठ सदस्य डॉ. रोहीदास व माधुरी आल्हाट यांनी केली. तसेच, आळंदी येथील वारकरी शिक्षण संस्थेतील विद्यार्थी दत्तक योजनेंतर्गत त्यांना अभ्यासासाठी नवीन मोबाईल व रोख 10 हजार रुपये मदत प्रदान केली. याशिवाय गरीब कर्णबधीर मुलाला व्हाईस मशीन घेण्यासाठी रुपये 5 हजार रुपये मदत देण्यात आली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. दिगंबर ढोकले यांनी केले तर, डॉ. दीपाली कुलकर्णी यांनी आभार प्रदर्शन केले.

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.