Chinchwad News: वृत्तपत्र छायाचित्रकार बापू ओव्हाळ यांचे निधन

एमपीसी न्यूज – वृत्तपत्र छायाचित्रकार बापू नामदेव ओव्हाळ (वय 59) यांचे  दीर्घ आजाराने आज (शुक्रवारी) निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले असा परिवार आहे.

बापू ओव्हाळ यांनी चिंचवड प्रवासी संघाच्या माध्यमातून चिंचवड येथे कोयना, सिंहगड एक्सप्रेसला थांबा मिळावा, आरक्षण केंद्र सुरु व्हावे, रेल्वे स्थानकाच्या सुविधा यासाठी 1989 ते 1995 सालापर्यंत उपोषण, आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला होता.

पिंपरी-चिंचवड युवक बिरादरी या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून पिंपरी चिंचवड शहर पातळीवर आयोजित सांस्कृतिक, शैक्षणिक व सामाजिक उपक्रमात अनेक वर्षे ते सक्रिय सहभाग घेत होते. वृत्तपत्रांसाठी त्यांनी छायाचित्रकार म्हणून काम केले.

काही दिवसांपासून ते आजारी होते. उपचारादरम्यान त्यांनी आज अखेरचा श्वास घेतला. काळेवाडी येथील स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.