Chinchwad News: 7696 मतदारांचे छायाचित्र नाही, शनिवार, रविवारी छायाचित्रे गोळा करण्यासाठी विशेष शिबिर

एमपीसी न्यूज – 205 चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या एकूण 491 यादी भागामधील 7 हजार 696 मतदारांची छायाचित्र मतदार यादीमध्ये दिसून येत नाहीत. छायचित्र नसलेल्या मतदारांचे छायचित्र गोळा करण्यासाठी येत्या शनिवारी आणि रविवारी विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे यादीत छायाचित्र नसलेल्या नागरिकांनी आपले छायाचित्र मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्याकडे जमा करण्याचे आवाहन मतदार नोंदणी अधिकारी स्मिता झगडे यांनी केले आहे.

मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्य यांच्या सूचनेनुसार मतदार यादीत छायाचित्र नसलेल्या मतदारांचे छायाचित्र अद्यावातीकरण करणे कार्यक्रम घोषित केला आहे. 205 चिंचवड विधानसभा मतदार संघाच्या एकूण 491यादी भागामधील 7 हजार 696 मतदारांची छायाचित्र मतदार यादीमध्ये दिसून येत नाहीत. छायाचित्र नसलेल्या मतदारांच्या नावांची यादी व मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांची दूरध्वनी क्रमांकासहित यादी जिल्हाधिकारी पुणे (www.pune.nic.in) व पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या (www.pcmcindia.gov.in) या Website वर माहितीकरिता व संपर्काकरिता उपलब्ध केलेले आहेत.

ज्या मतदारांची छायाचित्रे मतदार यादीत नाहीत. त्यांनी त्यांचे अलीकडच्या काळातील 2 रंगीत छायचित्र छायाचित्र व रहिवास पुराव्यासह (लाईट बिल, गॅस पुस्तक, राष्ट्रीयकृत बँकेचे खातेपुस्तक, पासपोर्ट इ) 205 चिंचवड विधानसभा मतदार संघाचे कार्यालय यशवंतराव चव्हाण माध्यमिक विद्यालय, दुसरा मजला, ग क्षेत्रीय कार्यालय थेरगाव येथे समक्ष अथवा शनिवार आणि रविवारी होणाऱ्या छायचित्र नसलेल्या मतदारांचे छायचित्र गोळा करण्याचे विशेष शिबिरात मतदान केंद्रावर संबंधित मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्याकडे जमा करावे.

ज्या मतदारांची या कालावधीत रहिवास पुरावा व छायाचित्र जमा होणार नाहीत. त्यांची नावे मतदार यादीतून वगळणी करण्याबाबतची पुढील कार्यवाही प्रस्तावित करण्यात येणार आहे. तसेच 1 जानेवारी 2021 नंतर ज्या मतदारांनी नावनोंदणी केलेली आहे. अशाच मतदारांचे मतदान ओळखपत्र वाटप मतदान केंद्रावर केले जाईल. शिबिर हे केवळ 491 यादीभागांमध्ये असलेल्या मतदारांसाठी मर्यादित आहे. इतर यादीभागातील छायाचित्र नसलेल्या मतदारांसाठी स्वतंत्र शिबिर यानंतर आयोजित करण्यात येईल.

कोविड 19 चा प्रादुर्भाव लक्षात घेता इतर कोणत्याही मतदान केंद्रव्यतिरिक्त इतर मतदान केंद्रातील किंवा 1 जानेवारी 2020 पूर्वी मतदार नावनोंदणी केलेल्या मतदारांनी गर्दी करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे. अधिक माहितीकरिता कोमल टिके 8830511215 आणि अमर कांबळे 7020787881 यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.