Pune News : ‘डॉक्टर डे’च्या निमित्ताने पुण्यात कोरोना योद्धा डॉक्टरांचा सत्कार

एमपीसी न्यूज – कोरोनाच्या काळात आपल्या जीवाची पर्वा न करता रुग्णांची सेवा करत आपले कर्तव्य पार पाडणाऱ्या डॉक्टरांचा सन्मान गुरुवारी करण्यात आला. ‘डॉक्टर डे’चे औचित्य साधून महापालिकेतील सभागृह नेते गणेश बिडकर यांच्या हस्ते कोरोना योद्धा डॉक्टरांचा सत्कार करून त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.

शहरासह संपूर्ण देशात गेल्या दीड वर्षापासून कोरोनाने थैमान घातले आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेपासून आतापर्यंत कोरोनाबाधित अनेक रुग्णावर उपचार करत डॉक्टरांनी त्यांना जीवनदान दिलेले आहे. अशा डॉक्टरांचा सन्मान करण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. डॉ. सुहास कलशेट्टी, डॉ. स्वप्ना कलशेट्टी यांचा गौरव करत तसेच दिवंगत डॉ. रमेश अंबिके यांनी करोणाच्या काळात दिलेल्या योगदानाचा आढावा घेऊन त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

भारतीय जनता पक्ष वैद्यकीय आघाडीच्या वतीने रास्ता पेठेतील समर्थ हॉस्पिटल येथे हा कार्यक्रम झाला. संघटनेच्या सहसंयोजक डॉ. तेजस्विनी अरविंद यांच्या पुढाकारातून हा कार्यक्रम घेण्यात आला.

कोरोनाच्या काळात आपले कर्तव्य बजविताना सोमवार पेठेतील डॉक्टर रमेश अंबिके याच आजाराचे बळी ठरले. या भागातील अनेक कुटुंबीयांचे ते फॅमिली डॉक्टर होते. त्याच्यासह इतर डॉक्टरांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा कार्यक्रम घेण्यात आला.
– गणेश बिडकर, सभागृह नेता, पुणे महापालिका

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.