Pimpri News: लसीचा साठा संपला; उद्या सर्व लसीकरण केंद्रे बंद

एमपीसी न्यूज – कोरोना प्रतिबंधक लसींचा साठा संपला आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवड शहरातील लसीकरण उद्या (शुक्रवारी) बंद राहणार आहे. शहरातील सर्व लसीकरण केंद्रे बंद राहणार आहेत.

पिंपरी-चिंचवड शहरामध्ये आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 व भारतीय साथरोग अधिनियम 1988 अन्वये कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत आहे. कोविड 19 या आजारावर केंद्र शासन व राज्य शासनाच्या प्राप्त मार्गदर्शक सुचनांप्रमाणे 16 जानेवारी 2021 पासून आरोग्य कर्मचारी (HCW), 2 फेब्रुवारी पासून आघाडीचे कर्मचारी (FLW), 1 मार्च पासून 60 वर्षावरील नागरिकांचे लसीकरण तसेच 1 एप्रिल 2021 पासून 45 वर्षावरील नागरिकांचे लसीकरण आणि 1 मे पासून 18 ते 44 वयोगटातील सर्व नागरिकांचे कोविड लसीकरण सुरू आहे.

कोरोना लसीचा साठा उपलब्ध नसल्याने पिंपरी-चिंचवड महापालिकेची सर्व लसीकरण केंद्रे बंद राहणार आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.