Pimpri News : रोजगार उपलब्ध न झालेल्या कलाकारांना मदतीचा हात

अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ, लायन्स क्लब, अनुप मोरे युवा फाऊंडेशनचा उपक्रम

एमपीसी न्यूज – कोविड काळात ज्या कलाकारांना रोजगार आणि उत्पन्न उपलब्ध होऊ शकत नाही अशांना एक महिना पुरेल इतके धान्य वाटप करण्यात आले. अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ, लायन्स क्लब, अनुप मोरे युवा फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने हा मदतीचा हात देण्यात आला.

या उपक्रमात इतर क्षेत्रातील अनेक मान्यवर कलाकारांनाही या मदतीचा लाभ घेता आला. अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष गोविंद कुलकर्णी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. त्यांनी ब्राह्मण समाज हा कायम समाजातील सर्व लोकांच्या मदतीसाठी उभा आहे असे सांगितले. महासंघाच्या काही पुढील योजनांची माहिती सुद्धा त्यांनी करून दिली.

ब्राह्मण महासंघाच्या अध्यक्षा शर्मिला महाजन म्हणाल्या, “पौरोहित्य ही ब्राह्मण मधील एक कला आहे. या आजच्या काळात त्यांना या कलेसाठी मर्यादा येत आहे आणि परिणामी त्यांच्याकडे उत्पन्नाचा स्त्रोतही मर्यादित होत आहे. अशा गरजू पौरोहित्य करणाऱ्या बांधवांच्या परिवाराला धान्य वाटप करून हे ही दिवस जातील, समाज त्यांच्या मागे आहे, हे सांगण्याचा या कार्यक्रमातून छोटासा प्रयत्न करत आहोत. म्हणूनच ब्राह्मण महासंघाने हा उपक्रम केलेला आहे.

कार्यक्रमात लायन्स क्लब व नृत्य कला मंदिरच्या तेजश्री अडीगे यांनी स्वागत केले. लायनेस उमा पाटील यांनी सर्वांची ओळख करून देत लायन्स क्लबची या कार्यक्रमामागची भूमिका स्पष्ट केली. कार्यक्रमाला शुभेच्छा देण्यासाठी माजी उपमहापौर शैलजा मोरे उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वृंदा गोसावी यांनी केले. कार्यक्रमासाठी आनंद देशमुख, मनीषा नातू, सचिन कुलकर्णी, विवेक गोसावी, मकरंद कुलकर्णी, हर्षद खळतकर, सुषमा वैद्य, एमपीसी न्यूज प्रतिनिधी अनुप घुंगुर्डे यांनी परिश्रम घेतले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.