Chinchwad News: यशस्वी उद्योजक बनण्यासाठी सर्वोत्तम असणे आवश्यक – हणमंतराव गायकवाड

एमपीसी न्यूज – ‘आयुष्यात जे कराल ते सर्वोत्तम करा. कोणताही व्यवसाय हा उत्तम कौशल्य, गुणवत्ता पूरक, टिकाऊपणा आणि सातत्य यावर अवलंबून असतो. आव्हानांची पातळी सातत्याने बदलत आहे. ध्येय ठरवून ते गाठण्यासाठी अंगी जिद्द, चिकाटी व कठोर परिश्रम करण्याची तयारी ठेऊन पूरक कृती केली तर निश्चितपणे स्वप्न साकार होते. यशस्वी उद्योजक बनण्यासाठी सर्वोत्तम असणे आवश्यक आहे, असे मत ‘भारत विकास ग्रुप’ (बीव्हीजी ग्रुप) चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक हणमंतराव गायकवाड यांनी व्यक्त केले.

_MPC_DIR_MPU_II

‘बिझ आयुरिस फाउंडेशन’ प्रकाशित व जितेंद्र गुप्ता लिखित ‘अ रोड मॅप फॉर एन्टरप्रिनर’ (A Road Map For Entrepreneur) पुस्तक प्रकाशन कार्यक्रमात ते बोलत होते. चिंचवड येथे शनिवारी (दि. 6) हा कार्यक्रम झाला. याप्रसंगी कल्याणी तुळजापूरकर, रसना जयस्वाल, दीपक परबत, कैलाश पिंजाणी, विक्रांत भुजबळराव, वत्संक प्रजापती, गौरव कुमार, लालबाबू गुप्ता उपस्थित होते.

‘उद्योजक होण्यासाठी व्यवसाय हा केवळ नफा हे उद्दिष्टय ठेऊन केला तर फार काळ टिकत नाही. व्यवसाय करताना आव्हान पेलण्याची क्षमता, नवीन शिकण्याची आवड आणि उत्तम कौशल्य आवश्यक आहे. मार्गदर्शन घेऊन अभ्यासपूर्ण केलेला व्यवसाय उत्तमरित्या चालू शकतो आणि तो अनंत काळापर्यंत टिकतो, असे जितेंद्र गुप्ता म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.