Chinchwad : पिंपरी-चिंचवड पोलिसांकडून बुधवारी 41 जणांवर कारवाई

Pimpri-Chinchwad police on Wednesday took action against 41 people-पिंपरी-चिंचवड पोलिसांकडून बुधवारी 41 जणांवर कारवाई

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड पोलिसांनी प्रशासनाच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी बुधवारी (दि. 1) 41 जणांवर कारवाई केली. लॉकडाऊनच्या नियमांमध्ये शिथिलता दिल्याने पोलिसांच्या कारवाईचा वेग देखील मंदावला आहे.

महाराष्ट्र राज्यात लॉकडाऊनचा सहावा टप्पा बुधवार (दि. 1 जुलै) पासून सुरु झाला आहे. हा टप्पा 31 जुलैपर्यंत राहणार आहे. लॉकडाऊनच्या प्रत्येक टप्प्यामध्ये काही प्रमाणात सूट दिली जात आहे.

सार्वजनिक वाहतूक देखील काही प्रमाणात सुरु करण्यात आली आहे. अन्य अनेक अस्थापना सुरु केल्या आहेत. त्यामुळे नागरिकांचा रस्ते आणि सार्वजनिक ठिकाणांवरील वावर वाढला आहे.

कोरोना विषाणूचा जोर दिवसेंदिवस वाढत आहे. त्यातच प्रशासनाकडून दिली जाणारी सूट त्यासाठी पोषक ठरत आहे. पोलिसांकडून देखील कारवाईचा वेग मंदावला आहे. लॉकडाऊनच्या पहिल्या आणि दुस-या टप्प्यात दररोज 200 ते 300 लोकांवर कारवाई केली जात होती. तोच आकडा आता 50-60 वर येऊन पोहोचला आहे.

मंगळवारी पिंपरी-चिंचवड पोलिसांनी भारतीय दंड विधान कलम 188 नुसार एमआयडीसी भोसरी (0), भोसरी (0), पिंपरी (3), चिंचवड (4), निगडी (0), आळंदी (0), चाकण (0), दिघी (0), म्हाळुंगे चौकी (0), सांगवी (12), वाकड (10), हिंजवडी (5), देहूरोड (0), तळेगाव दाभाडे (5), तळेगाव एमआयडीसी (0), चिखली (2), रावेत चौकी (0), शिरगाव चौकी (0) अशी एकूण 41 जणांवर कारवाई करण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.