Pune : शहरातील सर्व बेकायदेशीर केबल्स काढून टाका – मानसी देशपांडे

Remove all illegal cables in the city - Mansi Deshpande :शहरातील सर्व बेकायदेशीर केबल्स काढून टाका - मानसी देशपांडे

एमपीसी न्यूज – महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 1949 मध्ये एक इमारतीवरून दुसऱ्या इमारतीवर ओव्हरहेड टीव्ही, इंटरनेट, ब्रॅडबँड, ओएफसी केबल टाकण्यासाठी तरतूद नाही. त्यामुळे अशा प्रकारच्या सर्व बेकायदेशीर केबल्स शहराचे विद्रुपीकरण करीत असल्याने त्या काढून टाकाव्यात, असा प्रस्ताव नगरसेविका मानसी देशपांडे यांनी स्थायी समितीला दिला आहे. येत्या मंगळवारी बैठकीत त्यावर चर्चा होणार आहे.

पुणे महापालिकेने याबाबत योग्य ठराव करून सर्व प्रकारच्या ओव्हरटेड केबल्स आणि नव्याने टाकण्यात येणाऱ्या केबल्स यामध्ये सुसूत्रता आणून केबलसाठी प्रती मीटर एकरकमी किंवा वार्षिक ठराविक शुल्क आकारावे.

त्यातून महानगरपालिकेच्या आकाशचिन्ह विभाग आकारत असलेल्या शुल्काच्या प्रमाणात उत्पन्न मिळविता येईल, असेही प्रस्तावात म्हटले आहे.

शहरातील सर्व केबल धारकांना इमारतीवरून ओव्हरहेड केबल टाकण्यास मनाई करावी. त्या सर्व केबल्स पुणे महापालिकेच्या मालकीच्या भूमिगत डक्टमधून टाकण्यास बंधनकारक करावे.

केबल धारकांना प्रती मीटर एकरकमी किंवा वार्षिक शुल्क आकारल्यास महापालिकेला मोठ्या प्रमाणात महसूल मिळविता येणार आहे.

कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे महापालिकेच्या महसुलात घट झालेली आहे. ती भरून काढण्यासाठी याबाबतचा ठराव करण्यात यावा, असेही देशपांडे यांनी म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.