Chinchwad : शिस्तबद्ध मिरवणूक आणि सर्वोत्कृष्ठ कार्य करणा-या मंडळांचा चिंचवड पोलीस स्टेशन कडून गौरव

एमपीसी न्यूज – गणेशोत्सव कालावधीत विविध सामाजिक उपक्रम राबविणा-या तसेच विसर्जन मिरवणुकीत शिस्तीचे पालन पालन करणा-या मंडळांचा चिंचवड पोलीस स्टेशन कडून गौरव करण्यात येणार आहे. तसेच सर्वोत्कृष्ठ काम करणा-या मंडळाला फिरता करंडक देखील देण्यात येणार आहे.

गणेश मंडळांमध्ये शिस्त राहावी. मंडळांनी वायफळ खर्चाला फाटा देत सामाजिक उपक्रम राबवावेत. यासाठी चिंचवड पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक प्रभाकर शिंदे यांच्या कल्पनेतून हा उपक्रम यावर्षीपासून राबविण्यात येत आहे. सुभाष मालुसरे यांच्या मार्गदर्शनाखाली धनंजय कुलकर्णी, सतिश भारती, निलेश सायकर, स्मिता दुसाने, निर्मला जगताप, मधुकर साठे यांच्या पथकाने सर्व मंडळांचे परीक्षण केले आहे.
उत्कृष्ट कार्य करणाऱ्या तीन, शिस्तबद्ध विसर्जन मिरवणूकीसाठी तीन पारितोषिके देण्यात येणार आहेत. तसेच सर्वोत्कृष्ठ कार्य करणाऱ्या मंडळाला फिरता मोरया करंडक देखील देण्यात येणार असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रभाकर शिंदे यांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.