Chinchwad : जिजाऊंच्या चरित्राचे चिंतन घरोघरी होण्याची गरज –  राजेंद्र घावटे

एमपीसी न्यूज –   छत्रपती शिवाजीमहाराजांसारखे कृर्त्वत्ववाण पिढी निर्माण करण्यासाठी राजमाता जिजाऊंच्या चरित्राचे चिंतन घरोघरी होण्याची आज खरी गरज आहे असे मत  व्याख्याते राजेंद्र घावटे यांनी चिंचवड येथे व्यक्त केले. चिंचवड(पूर्णानगर)येथे नक्षत्र फेज-2 मध्ये सार्वजनिक गणेशोत्सवात राजमाता जिजाऊ माँसाहेब या विषयावर बोलत होते. यावेळी दत्तात्रय यादव,वैभव जगताप,पंकज निकम,अविऩाश घोलप आदी उपस्थित होते.
घावटे म्हणाले,शिवाजी महाराजांनी उभे केलेले रयतेचे राज्य म्हणजे युगानुयुगे आदर्श वाटावा असेच आहे.सर्वजातीला एकत्र आणून अतिशय प्रतिकूल परिस्थितीतुन मार्ग काढून मिळवलेले स्वराज्य हा पृथ्वीवरील मोठा चमत्कारच म्हणावा लागेल.शिवाजी आणि संभाजी असे दोन छत्रपती घडवणा-या,रयतेचे राज्य निर्माण करून स्वत्व आणि स्वाभिमानाचे स्फुल्लिंग जागृत करणाऱ्या राजमाता जिजाऊ ख-या अर्थाने स्वराज्यच्या संस्थापक ठरतात.लोकाभिमुख राज्य निर्माण करण्याची खरी संकल्पना जिजाऊंच्या शिकवणुकीतूनच महाराजांना मिळाली.जिजाऊंच्या संस्कारातून आणि प्रेरणेतून शिवाजी महाराजांसारखा युगप्रवर्तक राजा घडू शकला.होता

.रयतेचे दुःख दूर करण्यासाठी स्वकीयांचे राज्य निर्माण करण्याची महत्वाकांक्षा त्यांनी बाळगली होती.स्वकीय परकीयांच्या चाकरीत धन्यता मानत असत.परंतु रयत मात्र अन्याय आणि अनाचाराने त्रासली होती.चारित्र्यसंपन्न,नीतिमान,पराक्रमी,किर्तीवंत राजा म्हणून शिवाजीमहाराजांचे नावे घेतले जाते.त्यांना हा जिजाऊंचा वारसा लाभला आहे.आज नव्या पिढीसाठी जिजाऊंचे चरित्र अभ्यासणे गरजेचे आहे.विविध क्षेत्रातील शिवाजी निर्माण करण्यासाठी घरोघरी जिजाऊंच्या चरित्राचे पारायण झाले पाहिजे.

राजेंद्र घावटे यांचा पुणेरी पगडी,उपरणे व सन्मानचिन्ह देऊन जाहीर सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुबोध गलांडे यांनी केले.तर वैभव जगताप यांनी स्वागत केले.तर दत्तात्रय यादव यांनी आभार मानले

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.