Pune : गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांवरील गुन्हे मागे घ्या- रवींद्र धंगेकर

एमपीसी न्यूज –  ‘हिंदूचे सरकार’ अशी वल्गना करत ( Pune ) फिरता मग गणेशोत्सव, दहीहंडी हे हिंदूचे सण साजरे करणाऱ्या मंडळांच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे का दाखल करता? असा संतप्त सवाल काँग्रेसचे आमदार  रवींद्र धंगेकर यांनी गुरुवारी सरकारसमोर उपस्थित केला. गेल्या काही दिवसांत मंडळांच्या कार्यकर्त्यांवर दाखल केलेले गुन्हे तातडीने मागे घ्या, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.

गणेशोत्सव, दहीहंडी या उत्सवावरील निर्बंध आम्ही हटवले असून निर्बंध मुक्त वातावरणात सण साजरे करा, असे मुख्यमंत्री  एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले होते. उत्सवकाळातील 5 दिवस रात्री उशिरापर्यंत ध्वनिवर्धक लावण्याची परवानगीही सरकारने दिली होती. असे असताना मंडळांच्या कार्यकर्त्यांवर वेगवेगळी कलमे लावून गुन्हे दाखल केले जात आहेत.

Alandi : एमआयटी महाविद्यालयात बीबीए आणि बीबीए-आयबी विभागाच्या रिइफ आणि रॉ क्लबसाठी व्याख्यान आणि स्पर्धांचे आयोजन

या पार्श्वभूमीवर, काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेसच्या शिष्टमंडळाने पोलीस आयुक्तांची आज भेट घेतली.

यावेळी माजी आमदार मोहन जोशी, बाळासाहेब आमराळे, संजय बालगुडे, भाऊ करपे,यश वाघमारे, प्रशांत सुरवसे, रोहन सुरवसे यांच्यासह शहरातील विविध गणेश मंडळांचे असंख्य पदाधिकारी उपस्थित होते.

आमदार  रवींद्र धंगेकर म्हणाले, पुणे शहराला गणेशोत्सव, दहीहंडी,महंमद पैगंबर जयंती या उत्सवाची मोठी परंपरा आहे. केवळ राज्यातील किंवा देशातील नव्हे तर परदेशातील नागरिक हा उत्सव अनुभवण्यासाठी पुण्यनगरीत येतात.

मात्र, हा उत्सव आयोजित करण्यासाठी अहोरात्र मेहनत घेणाऱ्या गणेशोत्सव, दहीहंडी मंडळांच्या कार्यकर्त्यांवर चुकीची कारणे पुढे करून सध्या गुन्हे दाखल केले जात आहेत.

खुद्द मुख्यमंत्र्यांनी निर्बंध उठवलेले असताना मंडळांच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करणे, त्यांना नाहक त्रास देणे, त्यांना अपमानास्पद वागणूक देणे, असे पोलिसांकडून सुरू आहेत. उत्सव सप्टेंबर महिन्यात झाला. त्यावेळी पोलिसांनी अडवले नाही.

कारवाई केली नाही. नोटीस दिली नाही आणि आता नोव्हेंबर महिन्यात कारवाई केली जात आहे. 13,14 कलमे लावली जात आहेत. ही कारवाई चुकीच्या पद्धतीने होत आहे.

ती तातडीने थांबवावी व दाखल केलेले गुन्हे मागे घ्यावे, अशी मागणी आमदार रवींद्र धंगेकर यांनी केली. याबाबत लवकरच मुख्यमंत्री  शिंदे यांची भेट घेणार असल्याचेही ते म्हणाले.

पोलिसांचा सकारात्मक प्रतिसाद

काँग्रेसचे आमदार  रवींद्र धंगेकर यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेसच्या शिष्टमंडळ, विविध मंडळांचे पदाधिकारी आणि पोलीस अधिकारी यांच्यात आज पोलीस आयुक्त कार्यालयात बैठक झाली. यावेळी पोलिस आयुक्तांनी सकारात्मक प्रतिसाद  (Pune ) दिला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.