Chinchwad : सार्वजनिक मंडळाची मिरवणूक विसर्जन घाटाकडे रवाना

एमपीसी न्यूज : चिंचवडमध्ये (Chinchwad) दुपारी साडेचार वाजता शिवतेज मित्र मंडळाची मिरवणूक विसर्जन घाटाकडे रवाना झाली. त्यानंतर साडे सहाच्या सुमारास फटाक्यांची आतषबाजी करत चिंचवड स्टेशन येथील श्री ओंकार तरुण मंडळ मुख्य चौकात दाखल झाले.

मावळमधील ढोल ताशा पथक सहभागी झाले होते. सव्वा सातच्या सुमारास आलेल्या सद्गुरू गणेश मंडळाने झाडे लावा, आयुष्य वाढवा, सर्वांनी मिळून शपथ घेऊ, पर्यावरणाला सुरक्षित ठेवू, प्लास्टिक जाळू नका, प्रदूषण करू नका असा संदेश दिला.

पंजाब नॅशनल बँक फायनान्सचा गणपती विसर्जन घाटाकडे रवाना झाला. मंगलमूर्ती मित्र मंडळाने हरिनामाच्या गजरात (Chinchwad) मिरवणूक काढली. टाळ, पखवाज वादन करत भजनात गणेशभक्त दंग झाले होते. बाल वारकरी सहभागी झाले होते.

चिंचवड, चापेकर चौकात महापालिकेच्या वतीने स्वागत कक्ष उभारण्यात आला आहे. खासदार श्रीरंग बारणे, आमदार उमा खापरे, पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे, विजय खोराटे, उल्हास जगताप यांच्या हस्ते गणेश मंडळांचे स्वागत करण्यात आले. माजी नगरसेविका अश्विनी चिंचवडे, मोरेश्वर शेडगे आदी उपस्थित आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.