BNR-HDR-TOP-Mobile

Chinchwad : पुणे-एर्नाकुलम्-पुणे साप्ताहिक वातानुकुलित रेल्वेगाडीचे चिंचवड स्थानकात स्वागत

एमपीसी न्यूज – पुणे स्थानकावरून दर सोमवारी पुणे -एर्नाकुलम्-पुणे साप्ताहिक वातानुकुलित रेल्वेगाडी सुरु करण्यात आली आहे. सोमवारी या गाडीचे चिंचवड प्रवासी संघ व पुणे मल्याळी फेडरेशनच्या वतीने स्वागत करण्यात आले.

चिंचवड प्रवासी संघाचे पिंपरी येथील सामाजिक कार्यकर्ते पहेलाज लोकवाणी व चिंचवड स्थानक प्रमुख अनिल नायर यांच्या हस्ते इंजिनाला हार घालण्यात आला. तर, पुणे मल्याळी फेडरेशनच्या वतीने अध्यक्ष के. हरीनारायण व माजी अध्यक्ष राजन नायर यांच्या हस्ते वेलकम हमसफर एक्सप्रेस हा फ्लेक्स इंजनाला लावून स्वागत करण्यात आले. यावेळी चिंचवड प्रवासी संघाचे अध्यक्ष गुलामअली भालदार, शरद चव्हाण, मुकेश चुडासमा, मुकेश पंड्या, प्रविण बाठीया, योगेश परमार, मनोज जेठवाणी, जॉनी फ्रांसिस, भगवानदास खत्री, केशना जेठवाणी, नारायण नाथवाणी, दीपक लोहाना, किर्ती नाईक, निर्मला जगताप, पुणे मल्ल्याळी फेडरेशनचे टी.डी. जॉनी, राजन आर. नायर आदी मल्ल्याळी बांधव उपस्थित होते.

  • चिंचवड येथे दर सोमवारी येत्या 15 एप्रिल ते 5 पाच जून दरम्यान पुणे-एर्नाकुलम्-पुणे साप्ताहिक वातानुकुलित (एसी) गाडीला आज गाडीचे स्वागत चिंचवड प्रवासी संघाच्या वतीने व पुणे मल्याळी फेडरेशनच्या वतीने करण्यात आले. चिंचवड प्रवासी संघाचे पिंपरी येथील सामाजिक कार्यकर्ते पहेलाज लोकवाणी व चिंचवड स्थानक प्रमुख अनिल नायर यांच्याहस्ते इंजिनाला हार घालण्यात आले. तर, पुणे मल्याळी फेडरेशनच्या वतीने अध्यक्ष के. हरीनारायण व माजी अध्यक्ष राजन नायर यांच्याहस्ते मल्ल्याळी फेडरेशनचे वतीने वेलकम हमसफर एक्सप्रेस हे फ्लेक्स इंजनाला लावून स्वागत करण्यात आले.

पुणे येथून येत्या 15 एप्रिल पासून दर सोमवारी 13 डब्याची वातानुकूलित गाडी ( क्र.01467) सुरु करण्यात आली आहे. ही गाडी 15 एप्रिल ते 5 पाच जून दरम्यान धावणार असून पुणे रेल्वे स्थानकांतून संध्याकाळी 6 वाजून 45 मिनिटांनी सुटून ही गाडी चिंचवड, लोणावळा, कल्याण, पनवेल, रोहा, माणगाव , खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, थिवींम, करमाळी, मडगाव, कारवार, कुमठा, मुरुडेश्वर, भटकळ, मुकांबीक रोड, कुंदापूरा, उडपी, मुल्की, सुरत्काळ, मेंगलोरु जंक्शन, कासारगुड, कन्नूर, कोझिकोडे, शौरनोर जंक्शन, त्रिचूर, अलुवा मार्गे एर्नाकुलम जंक्शन येथे बुधवारी बुधवारी पहाटे दीड वाजता पोहोचणार आहे.

  • एर्नाकुलम् जंक्शन येथून दर बुधवारी पहाटे 3 वाजून 45 मिनिटांनी सुटून वरील परतीच्या मार्गाने चिंचवड येथे गुरुवारी सकाळी 11 वाजता येणार आहे. पुणे-एर्नाकुलम् 1421 किलोमीटर अंतर कापण्यासाठी 32 तास 40 मिनिटाचा अवधी लागणार आहे.
HB_POST_END_FTR-A2