Chinchwad : राजर्षी शाहू महाराज जलतरण तलावाचे होणार नुतनीकरण

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेचा (Chinchwad) मोहननगर येथील जलतरण तलाव गेल्या चार वर्षांपासून बंद असल्याने या जलतरण तलावाची तत्काळ दुरूस्ती करून सुरू करावा, अशी मागणी राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस विशाल बाळासाहेब काळभोर यांनी केली होती. या मागणीची दखल घेत आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी श्री छत्रपती राजर्षी शाहू महाराज जलतरण तलावाचे अत्याधुनिक पद्धतीने नुतनीकरण करणे व इतर स्थापत्य विषयक सुधारणांची कामे करण्यासाठी स्थायी समितीची नुकतीच मान्यता दिली आहे.

प्रभाग क्र. 14 मधील मोहननगर येथे श्री छत्रपती राजर्षी शाहू महाराज जलतरण तलाव आहे. मात्र, हा जलतरण तलाव गेल्या चार वर्षांपासून बंद आहे. या जलतरण तलावावर मोहननगर, काळभोरनगर, चिंचवड स्टेशन, रामनगर, लालटोपीनगर, दत्तनगर, विद्यानगर, शंकरनगर यासह आदी भागातील नागरिक, मुले पोहण्यासाठी येत होते. मात्र, हा तलाव करोनाच्या अगोदरपासून खोली कमी करण्याच्या नावाखाली बंद आहे.

क्रीडा विभाग आणि स्थापत्य विभागाच्या गलथान कारभारामुळे हा तलाव नियमापेक्षा जास्त म्हणजे 14 फूट खोल आहे. क्रीडा विभाग आणि स्थापत्य विभागाच्या अधिकाऱ्यांमध्ये समन्वय नसल्यामुळेच या तलावाचे काम गेल्या चार वर्षांपासून रखडले होते. मात्र, मोहननगर येथील जलतरण तलावाची तत्काळ दुरूस्ती करून सुरू करावा, अशी मागणी राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस काळभोर यांनी काही दिवसांपूर्वी केली होती.

या मागणीची दखल घेत आयुक्त सिंह (Chinchwad) यांनी श्री छत्रपती राजर्षी शाहू महाराज जलतरण तलावाचे अत्याधुनिक पद्धतीने नुतनीकरण करणे व इतर स्थापत्य विषयक सुधारणांची कामे करण्यासाठी मान्यता दिली आहे. याबाबत विशाल काळभोर म्हणाले, मोहननगर जलतरण तलावावर पोहण्यासाठी येणाऱ्यांची सातत्याने गर्दी असायची.

मात्र, गेल्या चार वर्षांपासून हा जलतरण तलाव बंद असल्याने खेळाडू, शालेय मुले, इतर नागरिकांची मोठी गैरसोय झाली. या जलतरण तलावातून महापालिकेला सर्वाधिक उत्पन्न मिळत होते. असे असताना क्रीडा विभाग आणि स्थापत्य विभागाच्या अधिकाऱ्यांमध्ये समन्वय नसल्याने हा तलाव बंद आहे. आता आयुक्तांनीच दखल घेऊन हा तलाव सुरू करण्यासाठी पाऊले उचलली आहेत, याबद्दल त्यांचे आपण मनापासून आभार मानतो.

Nigdi : प्रीपेड टास्कचे काम देऊन महिलेची 14 लाखांची फसवणूक

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.