Chinchwad : संघवी केशरी महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमाला संपन्न

एमपीसी न्यूज – श्री जैन विद्या प्रसारक मंडळ संचालित संघवी केशरी कला (Chinchwad) आणि वाणिज्य महाविद्यालय चिंचवड येथे बहि:शाल शिक्षण मंडळ, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या मान्यतेने डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमाला 6 ते 8 फेब्रुवारी या कालावधीत संपन्न झाली.

व्याख्यानमालेचे पहिले पुष्प भालचंद्र कोळपकर यांनी गुंफले. ‘हास्य भाष्य विनोदी कवितातून प्रबोधन’या विषयाद्वारे त्यांनी उपस्थितांचे प्रबोधन केले. यामध्ये त्यांनी हास्य कवितेच्या माध्यमातून व्यक्तिमत्त्व विकास आणि प्रबोधन केले. व्याख्यानमालेचे दुसरे पुष्प मारुती करंडे यांनी गुंफले. ‘हसता खेळता माणूस बनूया’ या विषयावर त्यांनी आपले मार्गदर्शन केले. मानवी जीवनात हास्य हे खूप मोलाचे आहे. हे सांगताना त्यांनी हास्याचे विविध प्रकार अभिनयासह विद्यार्थ्यांना करून दाखविले. विनोदी प्रहसने करत असताना विविध व्यक्ती, पशु-पक्षी, वाहने, यंत्र, वाद्ये यांचे हुबेहूब आवाज काढून श्रोत्यांचे मनोरंजन केले.

Mp Shrirang Barne : कर्जत ते लोणावळापर्यंत रेल्वे मार्गाचा सर्व्हे करावा; खासदार श्रीरंग बारणे यांची मागणी

तिसर्‍या पुष्पावेळी डॉ. श्वेता बापट यांनी ‘समाजमाध्यमांचा प्रभावी वापर’ या विषयावर व्याख्यान (Chinchwad) दिले. आपण दैनंदिन जीवनात वेगवेगळ्या समाजमाध्यमांचा वापर करतो परंतु आपण समाजमाध्यमांचा वापर करण्याऐवजी आपल्यासाठी, आपल्या करियरसाठी आपल्या विकासासाठी आपण समाजमाध्यमांचा वापर केला पाहिजे असे सांगितले.

या व्याख्यानमालेत आलेल्या व्याख्यात्यांना पुष्पगुच्छ देण्याऐवजी ग्रंथभेट देण्याचा उपक्रम राबविण्यात आला. त्यांना पिंपरी- चिंचवड शहराचा सविस्तर आणि साधार परिचय व्हावा या हेतूने श्रीकांत चौगुले यांनी लिहिलेले ‘पिंपरी-चिंचवड: गाव ते महानगर’ हे पुस्तक सदिच्छा भेट म्हणून देण्यात आले.

व्याख्यानमालेचे आयोजन श्री जैन विद्या प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष शांतीलाल लुंकड आणि ऑनररी जनरल सेक्रेटरी अ‍ॅड. राजेंद्रकुमार मुथा यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. सचिन ओहोळ, प्रा. नितिन जाबरे व प्रा. अभिषेक आकणकर यांनी केले. प्राचार्य डॉ. गौतम भोंग यांनी अध्यक्षपद भूषविले. यावेळी श्री जैन विद्या प्रसारक मंडळाचे मानद कार्यकारी अधिकारी खंडू खिलारी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. प्रवीण जावीर, प्रा. संतोष काशिद, प्रा. अविनाश कदम यांनी केले. प्रा. प्राजक्ता फलके, प्रा. धिरज शाखापुरे, प्रा. शीतल शिरवले यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. तर प्रा. तुकाराम सोळंके, प्रा. प्रशांत काजळे, प्रा. सुप्रिया रोटे यांनी आभार मानले.

youtube.com/watch?v=rdFR0KCX25c

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.