Chinchwad : वाल्हेकरवाडी मधील अनधिकृत झोपडपट्टी पवनेच्या पाण्यात

एमपीसी न्यूज – वाल्हेकरवाडी मधील रावेतकडे जाणाऱ्या मार्गावर पवना नदीच्या किनारी अनधिकृत झोपडपट्टी तयार झाली आहे. या झोपडपट्टीत पवना नदीचे पाणी शिरले असून संपूर्ण झोपडपट्टी पवनेच्या पाण्यात गेली आहे.

वाल्हेकरवाडी मधील नागरिक धनंजय वाल्हेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, मागील दोन वर्षांपूर्वी पवना नदीच्या पात्रात अनधिकृतरित्या झोपड्या बांधण्यात आल्या आहेत. या भागात सुमारे 70 ते 80 झोपड्या बांधण्यात आल्या आहेत. पवना नदीची पाणीपातळी वाढत असल्याने पवनेचे पाणी या झोपडपट्टीमध्ये शिरले.

रविवारी पहाटे ही झोपडपट्टी पूर्णतः पवनेच्या पाण्यात गेली. झोपडपट्टीमधील नागरिकांनी तात्काळ बाहेर पडून सुरक्षित ठिकाणी आश्रय घेतला. मागील दोन वर्षांपासून नदीपात्रात झोपडपट्टी तयार झाली असून प्रशासनाने याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले. यामुळे या कुटुंबांवर आज ही वेळ आली आहे. अशा संतापजनक प्रतिक्रिया वाल्हेकरवाडी मधील नागरिकांमधून व्यक्त करण्यात येत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.