Chinchwad :मंगळवारपासून तीन दिवसीय सुबोध व्याख्यानमाला

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड व्याख्यानमाला समन्वय समिती अंतर्गत मंगळवारपासून (दि.२३) तीन दिवसीय सुबोध व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. ही व्याख्यानमाला चिंचवड येथील साई मंदिर याठिकाणी रोज संध्याकाळी ७ वाजता होणार आहे.

व्याख्यानमालेचे प्रथम पुष्प मंगळवारी प्रा. प्रदीप कदम ‘छत्रपतींनी घडवलेला महाराष्ट्र’ या विषयावर गुंफणार आहेत. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शंकरराव पांढारकर असणार आहेत. बुधवार (दि. २४ ) द्वितीय पुष्प ‘पसायदान’या विषयावर ह.भ.प. किसनमहाराज चौधरी गुंफणार आहेत. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बाळासाहेब यादव असणार आहेत. अंतिम पुष्प गुरुवार (दि. २५) पिंपरी-चिंचवड साहित्य मंच आयोजित राष्ट्रजागर काव्यसंमेलनाच्या माध्यमातून गुंफले जाईल. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अनिल गायकवाड असणार आहेत.

  • रघु गावडे, प्रकाश कोठारी आणि महादेव कवितके प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील. साहित्यिक राजेंद्र घावटे सूत्रसंचालन करणार आहेत. या व्याख्यानांचा नागरिकांनी आवर्जून लाभ घ्यावा, असे आवाहन मुख्य संयोजक शंकर काळभोर आणि सुभाष पागळे यांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.