Chinchwad: चिंचवड परिसरातील पाणीपुरवठा विस्कळीत

एमपीसी न्यूज – थेरगाव उपविभागास पाणीपुरवठा करणा-या मुख्य गुरुत्ववाहिनीच्या देखभाल-दुरुस्तीचे तातडीचे काम हाती घेतले आहे. त्यामुळे आज (शनिवारी)चिंचवड परिसरातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे.

थेरगाव उपविभागास पाणीपुरवठा करणा-या मुख्य गुरुत्ववाहिनीच्या तातडीच्या देखभाल-दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे. त्यामुळे आजचा रहाटणी, श्रीनगर, विजयनगर- काळेवाडी, लक्ष्मणनगर, गणेशनगर, थेरगाव परिसर, कस्पटेवस्ती, पिंपळे निलख, वाकड परिसराचा दुपारनंतरचा तसेच सायंकाळचा पाणीपुरवठा उशीरा तसेच कमी दाबाने होणार आहे, असे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने कळविले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.