Alandi : आळंदी गावठाण विभागात आज दुपारनंतर पाणीपुरवठा

एमपीसी न्यूज – आळंदी शहरातील पाणी वितरण (Alandi ) करणारी मुख्य जलवाहिनी इंद्रायणी नगर बंधाऱ्याजवळ पुन्हा दि.13 मार्च  रोजी लिकेज झाली होती. काल रात्री शहरातील वेळापत्रकानुसार तिसऱ्या दिवशीचा हवेली भागातील शेवटचा टप्पा पूर्ण केला .त्यानंतर मध्यरात्रीपासून ते पहाटेपर्यंत लिकेज दुरुस्तीचे काम सुरू होते.

PCMC : महापालिका विभागांमध्ये कागद विरहीत कार्यप्रणालीची अंमलबजावणी सुरू

सदरचे काम  पूर्ण झाले असून टेस्टिंग घेऊन जलटाक्या भरण्यास आज (दि .14 ) दुपारपर्यंतचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. त्यानुसार आळंदी शहरातील गावठाण विभागातील पाणी टप्पे दुपारनंतर सुरु होईल. तरी अपरिहार्य कारणास्तव बदललेल्या वेळापत्रकास सर्व नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन आळंदी नगरपरिषद पाणीपुरवठा विभागाने केले आहे.याबाबत माहिती मुख्याधिकारी कैलास केंद्रे व पाणी पुरवठा कर्मचारी यांनी (Alandi ) दिली.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.