Alandi : श्री भैरवनाथ महाराज उत्सवानिमित्त कुऱ्हाडे कुटुंबीयांकडून शिखर काठीची मिरवणूक

एमपीसी न्यूज – दि.12 रोजी श्री भैरवनाथ महाराज उत्सवानिमित्त कुऱ्हाडे कुटुंबीयांकडून  शिखर( Alandi)  काठीची मिरवणूक पारंपरिक वाद्यात  सकाळी 10 वा.काढण्यात आली.या मिरवणूकीचे आयोजन सकाळी वडगांव रोड ते श्री भैरवनाथ महाराज मंदिरा  पर्यंत करण्यात आले होते.

Alandi : आळंदी गावठाण विभागात आज दुपारनंतर पाणीपुरवठा

या शिखर काठी मिरवणुकीचे हे यंद्याचे तिसरे वर्ष होते. ही मिरवणूक पाहण्यासाठी अनेक नागरिकांनी गर्दी केली होती. तसेच त्या रात्री श्रींच्या छबिना मिरवणुकी पुढे शिखर काठीने  श्री भैरवनाथ मंदिर -चावडी चौक – नगरपालिका चौक-महाद्वार चौक, स्वामी मठ – भैरवनाथ मंदिर असे मार्ग क्रमण केले.व श्री भैरवनाथ महाराज मंदिर येथे आरती होऊन त्याची सांगता ( Alandi)  झाली.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.