Phalguna : ओळख मराठी महिन्यांची – भाग 12– वसंत उत्सवाचा महिना फाल्गुन

एमपीसी न्यूज – फाल्गुन महिना हिंदू पंचांगानुसार ( Phalguna ) वर्षातील शेवटचा महिना फाल्गुन. प्रत्येक महिन्याचे काही वैशिष्ट्य असते तसे याचेही आहे. बदलत्या ऋतू पर्वात येणाऱ्या या महिन्याला वसंत उत्सवाचा महिना म्हणूनही ओळखले जाते. एकीकडे सरती थंडी व हलके जाणवणारी उन्हाची चाहूल. ऐन भरातला वसंताचा सोहळा आपण अनुभवत असतो.

सृष्टीमध्ये चैतन्याचे वातावरण असते. झाडांना नवीन गुलाबी पालवी फुटलेली असते. झाडे, वेली फळा- फुलांनी बहरलेली असतात .सगळीकडे सुगंध पसरलेला असतो .फुलांचा सुगंध वाऱ्याबरोबर सर्वत्र पसरत असतो. असे वाटते की सृष्टी जणू फुलांचा उत्सव साजरा करत आहे. आंब्याच्या झाडाला मोहर आलेला असतो. कोकिळेची कुहू कुहू सर्वत्र ऐकू येत असते. अशा निसर्गाच्या उत्सवाला साथ द्यायला येते .ती आपली होळी निसर्गाच्या रंगात रंगांची उधळण केली जाते.

फाल्गुन महिन्यात असते होळी. नैवेद्याला पुरणाची पोळी.   होळी पौर्णिमा किंवा हुताशनी पौर्णिमा. पुढे येणाऱ्या उन्हाळ्याची तीव्रता कमी करावी अशी विनंती करण्यासाठी अग्निदेवतेची केलेली ही पूजा आहे. होळी म्हणजे प्रज्वलित अग्नी, सरत्या वर्षातील सर्व वाईट गोष्टींचा नाश या अग्नीत करून आपण नवीन वर्षाचे स्वागत करायला सज्ज होतो.

Alandi : श्री भैरवनाथ महाराज उत्सवानिमित्त कुऱ्हाडे कुटुंबीयांकडून शिखर काठीची मिरवणूक

होळी नंतर पाच दिवसांनी रंगपंचमी हा सण साजरा होतो. यावेळेस आपण मनात’ रंग बरसे भीगे चुनरवाली, होळी आली रे होळी आली, रंगात रंगली दुनिया सारी वगैरे सारखी गाणी आठवत असतो. खेळताना रंग बाई होळीचा ही लावणी सुद्धा आपल्या आपल्याला आठवल्याशिवाय राहत नाही. कोकणात शिमगा साजरा केला जातो.

‘ होळी जळाली थंडी पळाली’ असे म्हणतात खरंच तसा फरक जाणवायला लागतो . तुकाराम बीज, एकनाथ षष्ठी, सावित्रीबाई फुले स्मृतिदिन, संभाजी महाराज बलिदान दिन, शिवाजी महाराजांचा तिथीने जन्मदिवस याच महिन्यात असतो. या महिन्यात हनुमान उपासना, त्यातून पंचमुखी हनुमानाची उपासना करणे, स्तोत्रपठण करणे आपल्याला शक्ती व आरोग्य प्रदान करते असे शास्त्रात सांगितले आहे .

बारा महिने आणि सहा ऋतू यामध्ये वर्षाचे दिवस कसे सरतात तेच समजत नाही. त्याप्रमाणे मागच्या चैत्रात सुरू केलेल्या लेखमालेचा हा शेवटचा म्हणजे तेरावा लेख आज सादर करत आहे कारण यावर्षी अधिक महिना होता. तुमच्या सर्वांच्या प्रोत्साहनामुळे मी माझी लेखमाला पूर्ण करू शकले सर्वांचे मनापासून ( Phalguna ) आभार.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.