BNR-HDR-TOP-Mobile

Chinchwad : मोटारसायकलचा आवाज कमी करण्यास सांगणाऱ्या महिलेला मारहाण

एमपीसी न्यूज – घरात लहान बाळ असल्याने मोटारसायकलच्या आवाजाने त्याला त्रास होतो. याबाबत मोटारसायकलस्वरांना आवाज कमी करण्यासाठी सांगणा-या महिलेला तिच्या मुलगी आणि बहिणीला दोघांनी मारहाण केली. ही घटना गणेशपेठ चिंचवडगाव येथे घडली.

गंगासागर राजेश पालकर (वय 42, रा. गणेशपेठ, चिंचवडगाव) यांनी याप्रकरणी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार चैतन्य चंद्रकांत जगताप आणि गौरी चैतन्य जगताप (दोघे रा. चिंचवडगाव) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी गंगासागर यांच्या घरी लहान बाळ असल्याने रस्त्यावरून मोठा आवाज करत जाणा-या वाहनांच्या आवाजामुळे बाळाला त्रास होत होता. त्याबाबत त्या वाहनचालकांना समजावून सांगत होत्या. त्यावेळी आरोपी चैतन्य आणि गौरी यांनी मिळून गंगासागर यांना दमदाटी केली. तसेच गंगासागर, त्यांची मुलगी आणि बहीण यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. यामध्ये गंगासागर जखमी झाल्या. त्यात त्यांच्या कानातील कर्णवेल गहाळ झाले. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.

HB_POST_END_FTR-A2

Advertisement

Advertisement

You might also like