Punavale News : हिंदू नववर्ष स्वागत समितीतर्फे गुढीपाडव्यानिमित्त काढलेल्या शोभायात्रेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

एमपीसी न्यूज – हिंदू नववर्ष स्वागत समिती पुनावळे, ताथवडे, माळवाडी तर्फे गुढीपाडव्यानिमित्त शोभायात्रा आयोजित करण्यात आली. या शोभायात्रेत नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला. या शोभायात्रेचे यंदा प्रथम वर्ष होते.

संत सावतामाळी मंदिर व्यवस्थापन आणि हरिभक्तांनी शोभायात्रेत टाळ, मृदूंगाच्या तालावर आणि रामकृष्ण हरीच्या भजनरुपी जयघोषात शोभायात्रा संप्पन्न झाली. शोभायात्रेमध्ये ग्रामस्थ, सहकारी सोसायट्यांमधील पुनावळेकर आणि विशेषतः वैशिष्टयपूर्ण वेषभूषेमध्ये श्रीराम, सीता, महाराणी येसूबाई, क्रांतीज्योती सावित्रीबाई, शाहिद भगतसिंग सहभागी बालगोपाळांची उपस्तीथी उत्साहवर्धक राहिली.

शोभायात्रेच्या स्वागतासाठी 100 फुटी रांगोळी काढण्यात आली. शोभायात्रेत सहभागी झालेल्या नागरिकांसाठी चहा, पाण्याची आणि प्रसादाची व्यवस्था करण्यात आली. गावठाणातील राम मंदिरात या शोभायात्रेचा समारोप झाला. यावेळी रामायणाचार्य महावीर महाराज सूर्यवंशी आणि संत तुकाराम महाराज यांचे 11 वे वंशज हभप शिरीष महाराज मोरे उपस्थित होते. त्यांनी यावेळी विचार व्यक्त केले. प्रभू श्रीरामाच्या आरतीने आणि हरिनामाच्या गजरात शोभायात्रेची सांगता झाली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.