Nigdi : सराफी व्यावसायिकाला बंदुकीचा धाक दाखवून पाच लाखांचे दागिने लुटले

एमपीसी न्यूज – भरदिवसा सराफी पेढीत घुसून दोघांनी सराफी मालकाला व दोन कामगारांना बंदुकीचा धाक दाखवून दुकानातील साडेपाच लाखांच्या सोन्याचे दागिने लुटून नेले. ही घटना शुक्रवारी (दि. 24)दुपारी दोन वाजता पुणे-मुंबई महामार्गावरील निगडीतील सचिन ज्वेलर्स येथे घडली. दिवसाढवळ्या घडलेल्या घटनेमुळे सराफी व्यावसायिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. 

याप्रकरणी नितीन सुरेश ओसवाल (वय 45, रा. निगडी, प्राधिकरण) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तोंडाला मास्क बांधलेले  दोघे जण शुक्रवारी दुपारी दोन वाजता सचिन सराफी पेढीत घुसले. सराफी पेढीचे मालक ओसवाल  आणि  दोन कामगारांना बंदुकीचा धाक दाखविला. सोन्याच्या ट्रे मधील 5 लाख 65 हजार 360 रूपयांच्या 178 ग्रॅमच्या 4 चैन लुटून नेत आरोपी दुचाकीवरून पसार झाले. निगडी ठाण्याचे पोलीस निरीक्षक सतिश पवार अधिक तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.