Pcmc : संपूर्णपणे अपयशी ठरलेली बीआरटीएस बंद करावी  –  राजेश अग्रवाल

एमपीसी न्यूज – विदेशामधून कॉपी केलेली बीआरटीएस शहरामध्ये पूर्णपणे अपयशी ठरली आहे. त्यामुळे महापालिकांनी (Pcmc) त्या त्वरीत बंद कराव्यात, अशी मागणी सामाजीक कार्यकर्ते राजेश अग्रवाल यांनी केली आहे.

Pune : जी-20 मधील परदेशी पाहुण्यांनी घेतला आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या कार्यक्रमात सहभाग

त्यांनी केलेल्या मागणीमध्ये म्हटले आहे की, भारतात जवळपास सर्व शहरात अपयशी ठरली आहे. बीआरटीएसचा मुळ उद्देश होता जास्तीत जास्त लोकांनी वैयक्तिक वाहने न वापरता सार्वजनिक वाहतुकीचा म्हणजेच बसचा वापर करावा.

 

सार्वजनिक वाहतूक व्यवस्था मजबूत व्हावी परिणामी रस्त्यावरील वाहतूक कमी होईल, जलद होईल, वाहन पर्किग प्रॉब्लेम कमी होतील. आज जवळपास  12 ते 15 वर्षा पासून पुणे व पिंपरी-चिंचवड भागात बी आर टी एस टप्या टप्याने वाढवली गेली. ज्या ज्या भागात आज बी आर टी एस राबवली गेली आहे त्या त्या भागात वाहतूक कोंडी प्रचंड प्रमाणत वाढली. गरीब वर्ग काल पण बसने प्रवास करत होता आणि आजही करत आहे.

 

मध्यम वर्ग ज्या प्रमाणात आधी बसचा वापर करत होते तेवढाच आजही करत आहे. उच्च वर्गीय लोक आधी सुध्दा कार वापरत होते आणि आज ही कार वापरत आहे. मग इतक्या वर्षात बीआरटीएस राबवून शासनाने रस्त्यावरील फक्त वाहतूक कोंडी वाढवली आहे.

 

बीआरटीएसचा मार्ग व बस स्टॉप रस्त्याच्या मध्यभागी असल्यामुळे प्रत्येक बस स्टॉप जवळ लोकांना रस्ता ओलांडण्यासाठी स्पीड ब्रेकर लावले आहेत. यामुळे दर एक किलोमीटर वर सर्व्हिस रोड वर स्पीड ब्रेकर आहेत परिणामी सर्व्हिस रोड वरील वाहतुकीची गती मंद झाली आहे.

 

त्यामुळे सर्व्हिस रोडवरील वाहतूक कोंडी वाढली. एक संपूर्ण लेन फ्कत बससाठी असल्यामुळे सर्व्हिस रोड खूप छोटे झाले त्यामुळे परत वाहतूक कोंडी वाढली. प्रत्येक चौकात बस सोडून बाकी सर्व वाहनांना उजवी कडे वळताना रस्त्याच्या मध्यभागी असलेल्या बीआरटीएस लेनमधून सरळ जाणाऱ्या बस मुळे खूप गोंधळ उडतो. काही बस बीआरटीएस मार्गाने जातात तर काही बस नेहमीच्या जुन्या पद्धतीने सर्विस रोड ने जातात त्या मुळे प्रवाशांनी नेमके कुठे थांबायचे हा गोंधळ होतो.

 

बीआरटीएससाठी काय करता येईल याबद्दल बोलताना अग्रवाल म्हणाले की, हे चित्र बदलण्यासाठी आज  बीआरटीएसची जी रस्त्याच्या मधोमध  लेन आहे व रस्त्याच्या मध्य भागी असलेले बस स्टॉप आहेत ते  संपूर्ण शहरातील काढून टाकावे.

बीआरटीएसवर जो प्रचंड पैसा शासनाने खर्च केला आहे किंवा निविन बी आर टी एस मार्ग विकसित करण्यासाठी जो पैसा खर्च करत आहे तो पैसा वाचवून त्यातून दर पाच मिनिटात मोठ्या व लांब रस्त्यासाठी मोठी व अरुंद रस्त्यासाठी छोट्या बसेस शासनाने उपलब्ध करून दयाव्यात.

सर्व बसेस एकदम स्वच्छ असाव्यात, सर्व बसेस वातानुकूलित असाव्यात,सर्वात महत्त्वाचे सर्व बस चे दर एकदमच कमी करावे, सर्व रस्त्यावर वैयक्तिक वाहन लावण्यासाठी पे अँड पार्क असावते. पे अँड पार्कचे दर डबल करावे.

स्वच्छ, सुंदर खूपच कमी दरात आणि दर पाच मिनिटात बस भेटली तर गरीब, मध्यम वर्गीय व उच्च वर्गीय सर्व जण बस चां वापर मोठ्या प्रमाणात करतील. जे शेकडो कोटी आयात कॉपी पेस्ट केलेल्या बी आर टी एस ने शक्य झाले नाही ते ह्या देशी स्वच्छ, सुंदर, वातानुकूलित व दर पाच मिनिटात भेटणाऱ्या बस सिस्टीम ने नक्कीच साध्य होईल, असे ही मत राजेश अग्रवाल यांनी व्यक्त केले आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.