Corona Vaccination : मोठी बातमी ! 16 जानेवारीपासून भारतात कोरोना लसीकरण

एमपीसी न्यूज – कोरोना लसीकरणाबाबत प्रतिक्षा संपली आहे. येत्या 16 जानेवारीपासून भारतात लसीकरणाचा कार्यक्रम सुरू होणार आहे. आरोग्य कर्मचाऱ्यांना सर्वात आधी लस दिली जाणार आहे.

त्यानंतर 50 वर्षांपेक्षा जास्त वय असणाऱ्यांना नागरिकांना लस दिली जाणार आहे. पहिल्या टप्प्यात 3 कोटी नागरिकांचं लसीकरण होणार आहे.

कोरोना प्रतिबंधक दोन लसींना केंद्र सरकारने मान्यता दिल्यानंतर लसीकरण कधी सुरु होणार याबाबत देशभरात चर्चा सुरु होती.

दोन टप्प्यात ड्राय रन घेण्यात आलं होतं. त्यानंतर आता 16 जानेवारीपासून प्रत्यक्षात लसीकरणाला सुरुवात होणार आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.