Corona Vaccine : ‘कोविशिल्ड’ आणि ‘कोव्हॅक्सिन’ लसींना तातडीच्या वापरासाठी परवानगी

एमपीसी न्यूज – सीरम आणि ऑक्सफोर्डची ‘कोविशिल्ड’ आणि भारत बायोटेक कंपनीने तयार केलेल्या ‘कोव्हॅक्सिन’ या दोन्ही लसींना आपात्कालीन वापरासाठी संमती देण्यात आली आहे. डीसीजीआयने घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली.

दोन्ही लसी 110 टक्के सुरक्षित आहेत. थोडेफार दुष्परिणाम असतातच जसे की दंडावर दुखणं, थोडासा ताप येणं, थोडीशी अॅलर्जी होणं हे तर प्रत्येक लसीसाठी सामान्य आहे. असं डीसीजीआयचे संचालक व्ही जी सोमाणी यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं.

_MPC_DIR_MPU_II

कालच कोरोना लसीकरणाचा ड्राय रन पार पडला असून, आज दोन्ही लसींना आपात्कालीन वापरासाठी संमती देण्यात आली आहे. या दोन्ही व्हॅक्सिन अर्थात लसी पूर्णपणे सुरक्षित आहेत असं डीसीजीआयने म्हटलं आहे. पहिल्या टप्प्यात अडीच कोटी लोकांना लस दिली जाण्याची शक्यता आहे.

दरम्यान, कोविशिल्डला परवानगी देण्यात आल्यानंतर पुनावाला यांनी ट्विट करत आपल्या भावना व्यक्त केल्या. ‘सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा. लस संकलनासाठी सीरम इन्सिट्यूट ऑफ इंडियाने पत्करलेल्या सर्व अडचणींचं अखेर यश मिळालं. कोरोनावरील भारताच्या पहिली लस असलेल्या कोविशिल्डला मंजुरी मिळाली आहे. ही लस सुरक्षित आणि परिणामकारक आहे आणि पुढील काही आठवड्यात लोकांना देण्यासाठी तयार आहे’ असं पुनावाला यांनी म्हंटल आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.