Cow stolen : गुंगीचे इंजेक्शन देऊन गायीला चोरले

एमपीसी न्यूज : फिरस्त्या गाईला गुंगीचे इंजेक्शन देऊन कत्तल करण्यासाठी (Cow stolen) गाईला चोरून नेल्याची घटना सोमवारी (दि.12) मध्यरात्री भोसरी गाव येथे घडली.

पोलीस शिपाई अनंता गवारी यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार चार अनोळखी इसमाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Goa ganpati visarjan : गोव्यात गणेश विसर्जनाचा आगळावेगळा “सांगडोत्सव”, शेकडो वर्षांची पंरपरा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भोसरी गाव येथे दिघी आळंदी रोडवर फिरस्ती गायीला चार जणांनी गुंगीचे इंजेक्शन देऊन बेशुद्ध केले.(Cow stolen) त्या गायीची कत्तल करण्यासाठी आरोपींनी तिला चोरून नेले. हा प्रकार मध्यरात्री साडेबारा वाजेच्या सुमारास घडला. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.