Goa ganpati visarjan : गोव्यात गणेश विसर्जनाचा आगळावेगळा “सांगडोत्सव”, शेकडो वर्षांची पंरपरा

एमपीसी न्यूज : (प्रमोद यादव) गणेशोत्सव हा गोव्यातील सर्वात मोठा हिंदू सण आहे. नुकतेच अनंत चतुर्थीला ठिकठिकाणच्या गणपतीचे विसर्जन पार पडले.(Goa ganpati visarjan) गोव्यात मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा केला जातो. येथे गणेश चतुर्थीला चवथम्हणतात, आणि गणपती म्हटले की येते ती माटोळी. माटोळी म्हणजे विविध भाजा, फळे, वनस्पती यांची गणपतीच्या वरती बाधायचे तोरण किंवा झुंबर म्हणता येईल.

पोर्तुगीजांच्या धर्माधिष्ठीत सत्तेत येथील जनेतवर अनेक बंधने होती. हिंदू सणांवर बंदी होती. येथील लोक चोरून गणेशोत्सव साजरा करायचे. चित्राचा गणपती, पेटीच्या दारावर पूजन केला जायचा आणि पोर्तुगीज सैनिकांची धाड पडलीच तर, ते दार बंद केले जायचे. अशा परिस्थितीत देखील गोव्यातील नागरिकांनी संस्कृती जपली आणि वाढवली.

Chakan Crime : अल्पवयीन मुलीला धमकी देत अत्याचार करणाऱ्या नराधमावर गुन्हा

कुंभारजुवे येथील “सांगडोत्सव”

माशेल, कुंभारजुवे येथील शांतादुर्गा कुंभारजुवेकरीण देवीच्या देवस्थानात सात दिवसीय गणपती विराजमान होतात. सात दिवस भक्तीभावाने पुजा केल्यानंतर गणपतीचे विसर्जन केले जाते.(Goa ganpati visarjan) हा विसर्जनाचा सोहळा म्हणजेच “सांगडोत्सव”. मांडवी नदी पात्रात हा उत्सव साजरा होतो. दोन होड्यांची सांगड घालायची आणि त्यावर जिवंत देखावा सादर केला जातो. असे अनेक देखावे एकामागे एक आणि शेवटी गणपती असतो. देखावे सादर करत नदीतून सात फेऱ्या घातल्यानंतर गणपतीचे विसर्जन केले जाते.

प्रजाकसत्ताक दिनी लाल किल्ल्यावर विविध राज्यांचे चित्ररथ दाखवले जातात, तसेच हे तरंगते चित्ररथ असतात. फक्त हे चित्ररथ पौराणिक, ऐतिहासिक किंवा एखाद्या विषयावर भाष्य करतात. यावर्षी ‘इंद्राने रावण को बंदी बनाया’ हा चित्ररथ प्रथम तर, ‘देव वेताळकडून मृतांना पुरर्जन्म’ असे चित्ररथ होते.(Goa ganpati visarjan) सांगडोत्सव गोव्यातील एक प्रसिद्ध उत्सव आहे. पूर्वजांपासून साजऱ्या होणाऱ्या या उत्सवाला शेकडो वर्षांची परंपरा आहे, असे कुंभारजुवे येथील नागरिक सांगतात.

विशेष हे जिवंत देखावे पाहताना एक क्षण देखील तुमची नजर हटत नाही. अनोखा उत्सव खूप भावला म्हणून फेसबुकवर ‘शेअरोत्सव’ करावा म्हटलं. नाही म्हणजे सनबर्न, रेव्ह पार्टी, बीच पार्टी, डिजे याशिवाय असे युनिक उत्सव देखील गोव्याची एक ओळख आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.