Crime News : प्रवासी म्हणून आलेल्या दोघांनी रिक्षाचालकाला मारहाण करत केले अपहरण

एमपीसी न्यूज – प्रवासी म्हणून रिक्षा थांबवली खरी पण रिक्षा चालकाला मारहाण करत त्याचेच रिक्षातून अपहरण करण्याचा प्रयत्न केला मात्र चालत्या रिक्षातून उडी मारत रिक्षाचालकाने स्वतःची सुटका करून घेतली.ही घटना पिंपळे गुरव परिसरात रविवारी (दि.11) रात्री साडेदहा वाजता घडली.

संदिप दिलीप थोरात (वय 39 रा. मोशी) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.त्यानुसार दोन अनोळखी व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे कासारवाडी रेल्वे स्थानकावरून घरी मोशीकडे जात असताना वायसीएम हॉस्पीटल येथे आरोपींनी रिक्षाला हात करून थांबवले. यावेळी त्यांनी पिंपळे गुरुव येथे जेवणाचा डब्बा आणयचा आहे असे कारण सांगितले.त्यानुसार फिर्यादी यांनी त्यांना रिक्षात बसवून पिंपळे गुरव येथे नेले. तेथे जाताच दोघेही रिक्षातून खाली उतरले काहीवेळ फोनवर बोलले व त्यानंतर रिक्षात बसून त्यांनी रिक्षा चालकाला मारहाण करण्यास सुरुवात केली.यावेळी त्यांनी फिर्यादीला मागच्या सिटवर बसवले व तू जर आमचे एकले नाही तर तुला मारून टाकू अशी धमकी दिली.

रिक्षा घेऊन आरोपी पिंपळे गुरुव येथील नर्मदा रोडने जात होते. यावेळी फिर्यादी यांनी चालत्या रिक्षातून उडी घेत स्वत-ची सुटका करून घेतली.यावेळी आरोपींनी मात्र फिर्यादी यांची एम.एच.14 एच.एम.3168 क्रमांकाची रिक्षा व 2 हजार रुपयांचा मोबाईल असा एकूण 52 हजार रुपयांचा एवज चोरून घेऊन गेले. सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.