Dighi : तरुणीची वाट अडवल्याप्रकरणी तरुणावर गुन्हा

एमपीसी न्यूज – तरुणीला पाहुन तिच्या दुचाकीसमोर उभा राहून तिची वाट अडवली. तसेच वाहनाची चावी काढून तरुणीला जाण्यास मज्जाव केल्याप्रकरणी प्रियकर तरुणावर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना च-होली फाटा येथे पेट्रोल पंपाजवळ शनिवारी (दि. 19) दुपारी पाचच्या सुमारास घडली.

विवेक चंद्रदेव राम भारती (वय 28, रा. परांडेनगर, दिघी) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पीडित तरुणीने दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी आणि आरोपी तरुणाचे पूर्वी प्रेम संबंध होते. काही कारणांवरून त्यांच्यात दुरावा आला. त्यानंतर शनिवारी दुपारी पाचच्या सुमारास तरुणी दुचाकीवरून घरी जात होती. दिघीमधील च-होली फाटा येथे पेट्रोल पंपासमोर तरुणी आली असता आरोपी तरुण तिच्या दुचाकीसमोर उभा राहिला. त्याने तरुणीच्या दुचाकीची चावी काढून घेतली. आरोपीने तरुणीला शिवीगाळ केली. यावरून तरुणीने दिघी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला. दिघी पोलीस याचा अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.