Pimpri : पूर्ववैमनस्यातून तरुणावर कोयत्याने वार

Pimpri : पूर्ववैमनस्यातून तरुणावर कोयत्याने वार

एमपीसी न्यूज – जुन्या भांडणाच्या रागातून तरुणावर कोयत्याने वार केले. यामध्ये तरुण गंभीर जखमी झाला. ही घटना पिंपरी गावात नवमहाराष्ट्र शाळेजवळ शुक्रवारी (दि. 18) रात्री दहाच्या सुमारास घडली.

याप्रकरणी ओंकार बाळू सरोदे (वय 18, रा. हरिओम सोसायटी, काकडे पार्कजवळ, चिंचवडगाव) या तरुणाने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार आशुतोष वाघिरे (वय 19), सुशील शिंदे (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही) आणि हृषीकेश उर्फ मोन्या शामराव वाघिरे (वय 20, रा. श्रीधर अपार्टमेंट, पिंपरीगाव) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी ओंकार आणि आरोपी यांच्यामध्ये मागील काही दिवसांपूर्वी किरकोळ कारणांवर भांडण झाले होते. त्या भांडणाचा राग मनात धरून आरोपींनी ओंकार याला शुक्रवारी रात्री दहा वाजता पिंपरी गावातील नवमहाराष्ट्र शाळेजवळ शिवीगाळ केली. तसेच कोयत्यासारख्या हत्याराने त्याला मारहाण केली. यामध्ये ओंकार गंभीर जखमी झाला. पिंपरी पोलिसांनी आरोपी हृषीकेश याला अटक केली. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.