Dighi Crime News : सिमेंट मिक्सर चालकाला टोळक्याकडून विनाकारण मारहाण

एमपीसी न्यूज – पाच ते सहा जणांच्या टोळक्याने एका सिमेंट मिक्सर चालकाला धक्काबुक्की व शिवीगाळ करत परिसरात दहशत निर्माण केली. तसेच मिक्सर आणि एका दुचाकीचे नुकसान केले. ही घटना गुरुवारी (दि. 7) दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास काळे कॉलनी, दिघी येथे घडली.

विकास गोविंद केदार (वय 27, रा. काटे कॉलनी, देहूफाटाजवळ, ता. हवेली. मूळ रा. अहमदनर) यांनी याप्रकरणी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अनोखी पाच ते सहा जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे टी एम मिक्सरवर चालक म्हणून काम करतात. गुरुवारी दुपारी साडेतीन वाजता ते काळे पेट्रोल पंपाजवळ देहूफाटा येथे मिक्सर मधील सिमेंट काँक्रीट खाली करत होते. त्यावेळी आरोपी तिथे आले. त्यांनी मिक्सरच्या पुढील काचेवर दगड मारून नुकसान केले. फिर्यादी यांना धक्काबुक्की करून शिवीगाळ करत परिसरात दहशत माजवत निघून गेले. क्रिष्णा पंडित गडदे यांच्या दुचाकीवर काठीने मारून दुचाकीचे नुकसान केले. तसेच क्रिष्णा यांना हातावर मारून जखमी करत दहशत माजवून आरोपी निघून गेले. दिघी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.