Pimpri News: युवासेनेच्या वतीने नवरात्रीनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

एमपीसी न्यूज – पिंपरी युवासेनेच्या वतीने नवरात्र उत्सवानिमित्त प्रभाग 30 दापोडी -फुगेवाडी – कासारवाडी मधील नागरिकांसाठी सर्व शासकीय दाखले मोफत देण्याच्या उपक्रमांचे आयोजन केले आहे. शिवसेना शहरप्रमुख, नगरसेवक सचिन भोसले यांच्या हस्ते या उपक्रमांचे उदघाटन करण्यात आले.

शिवसेना उपविभाग प्रमुख एकनाथ हाके, शीला जाधव, प्रमोद गायकवाड, संजय गरुड, रवी कांबळे, राहुल जाधव, अक्षय गायकवाड, राहुल जाधव, रामभाऊ शिंगोटे, प्रभाकर हिंगे, सोपानतात्या सातपुते,दीपक साळवे, संदेश बोराडे,गुरुदत्त जाधव, मनीषा पाटोळे, मनीषा मडके, शुभांगी गायकवाड, यावेळी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन पिंपरी युवाअधिकारी निलेश हाके यांनी केले.

दरम्यान, सर्व शासकीय दाखले (जातीचा दाखला,रहिवाशी दाखला,उत्पन्न दाखला, नॉन क्रीमीलअर दाखला,) हे नागरिकांना मोफत काढून देण्यात येणार आहे. तसेच 10ऑक्टोबर रोजी मोफत पॅनकार्ड व रेशन कार्ड मध्ये नाव वाढविणे, कमी करणे, पत्ता बदल, नवीन, दुरुस्ती करून देण्यात येणार आहे.

11 ऑक्टोबर ते 14ऑक्टोबर पर्यंत ‘आयुष्यमान भारत’ योजना राबविण्यात येणार आहे. कार्यक्रमाची वेळ सकाळी 10 ते 6 पर्यंत असणार आहे. अधिक माहितीसाठी 8806720672,7276970972 या नंबरवर संपर्क साधण्याचे आवाहन आयोजकांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.