Pune Unlock : पुण्यात हॉटेल 11 वाजेपर्यंत खुली ठेवण्यास परवानगी, पर्यटनस्थळे, महाविद्यालये सुरू होणार

एमपीसी न्यूज – पुण्यातील हॉटेल 11 वाजेपर्यंत खुली ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. तसेच, पुण्यातील पर्यटनस्थळे आणि महाविद्यालये सुरू होणार आहेत. येत्या सोमवारपासून (दि.11) या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी पुण्यात याबाबत माहिती दिली.

पुण्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यानंतर त्यांनी बैठकीत घेतलेल्या विविध निर्णयाची माहिती दिली.

बैठकीत घेण्यात आलेले विविध निर्णय –

  • खासगी आस्थापनेत 100 टक्के कर्मचारी उपस्थितीला परवानगी
  • सोमवारपासून (दि.11) सर्व महाविद्यालये आणि विद्यापीठे सुरू करण्यास परवानगी
  •  विद्यार्थ्यांनी लसीचे दोन्ही डोस घेणे बंधनकारक, तसेच बाहेरच्या जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना RTPCR बंधनकारक
  • हॉटेल 11 वाजेपर्यंत खुली ठेवण्यास परवानगी
  • ग्रामीण आणि शहरी भागातील पर्यटनस्थळे सुरू होणार
  • 22 ऑक्टोबरपासून 50 टक्के क्षमतेने नाट्यगृह आणि सिनेमागृह सुरू राहणार
  • ट्रेनिंग सेंटर सुरू होणार

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.