Pimpri : वाहन चोरीचे सत्र सुरूच; पिंपरी, दिघी, बोपोडी परिसरातून चार दुचाकी चोरीला

Vehicle theft sessions continue; Four two-wheelers were stolen from Pimpri, Dighi and Bopodi areas

एमपीसी न्यूज – पिंपरी चिंचवड परिसरात वाहन चोरीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहे. दररोज वाहन चोरीच्या घटना पोलीस ठाण्यात नोंदवल्या जात आहेत. पिंपरी, दिघी, बोपोडी परिसरातून चार दुचाकी गेल्या असून या प्रकरणी शुक्रवारी संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

दुचाकी चोरीची पहिली घटना 20 जून रोजी म्हासुळकर कॉलनी पिंपरी येथे घडली. सिद्धेश्वर पांडुरंग मुसळे (वय, 29 रा. म्हासुळकर कॉलनी, पिंपरी) यांनी शुक्रवारी (दि. 26) पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

याबाबत पोलिसांनी अज्ञात इसमा विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 20 जून रोजी मुसळे यांनी पन्नास हजार किमतीची (एमएच 24 एजे 8018) दुचाकी लॉक करून घरासमोर पार्क केली होती. पार्क केलेली दुचाकी अज्ञात इसमाने चोरून नेली.

पिंपरी पोलीस अधिक तपास करत आहेत.

दुचाकी चोरीची दुसरी घटना 20 जून रोजी अजमेरा कॉलनी, पिंपरी येथे घडली. मजू मधुसूदन पिल्लई ( वय, 39 रा. अजमेरा, पिंपरी) यांनी शुक्रवारी (दि. 26) पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

त्यानुसार पोलिसांनी अज्ञात इसमा विरोधात गुन्हा दाखल केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 20 जून रोजी पिल्लई यांची वीस हजार किमतीची (एमएच 14 सीआर 0255) दुचाकी लॉक करून घरासमोर पार्क केली होती. पार्क केलेली दुचाकी अज्ञात इसमाने चोरून नेली असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

पिंपरी पोलीस अधिक तपास करत आहेत.

दुचाकी चोरीची तिसरी घटना 24 जून रोजी मथन सोसायटी, डुडुळगाव येथे घडली. विजय बाजीराव शिंदे ( वय, 31 रा. मथन सोसायटी, डुडुळगाव) यांनी शुक्रवारी (दि. 26) दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 24 जून रोजी शिंदे यांची वीस हजार किमतीची (एमएच 17 एवाय 8026) दुचाकी लॉक करून घरासमोर पार्क केली होती. ही दुचाकी अज्ञाताने चोरून नेली.

दिघी पोलीस अधिक तपास करत आहेत.

दुचाकी चोरीची चौथी घटना 26 जून रोजी आदर्श नगर बोपोडी येथे घडली. विकी बाळासाहेब गायकवाड ( वय, 24 रा. आदर्श नगर, बोपोडी) यांनी शनिवारी (दि.27) पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 26 जून रोजी शिंदे यांची तीस हजार किमतीची (एमएच 12 पीयु 8416) दुचाकी लॉक करून घरासमोर पार्क केली होती. ही दुचाकी अज्ञात इसमाने चोरून नेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

पिंपरी पोलीस अधिक तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.